नांदेड(प्रतिनिधी)-रिंदाच्या बापाची जामीन करण्यासाठी 20 हजार रुपयांची खंडणी मागून कुटूंबास संपवून टाकण्याची धमकी देणाऱ्याला इतवारा पोलीसांनी पकडल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे.
गिरधारीसिंह रामलासिंह राजपुरोहित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.26 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास ते आपल्या छप्पनभोग स्विटमार्ट या दुकानावर बसले असतांना त्यांना 9881321313 या मोबाईलचे धारक अजितसिंघ तबेलेवाले याने फोन करून सांगितले की, मी गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळ राहतो. भाई रिंदाचा बाप जेलमध्ये आहे त्याची जामीन करण्यासाठी 20 हजार रुपये माझ्या फोन क्रमांकावर ऑनलाईन टाक. उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत मला आणून दे पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या कुटूंबाला खतम करून टाकली. इतवारा पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 387 नुसार गुन्हा क्रमांक 24/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव यांच्याकडे देण्यात आला. आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अजितसिंघ तबेलेवालेला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
रिंदाच्या बापाची जामीन करण्यासाठी खंडणी; एक जण पोलीस कोठडीत