नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण खाजगी व्यक्तीसोबत सुध्दा आपला बराच वेळ घालवतात. काय असेल या वेळ घालविण्यामध्ये याचा शोध मात्र लावता आला नाही. पण स्थानिक गुन्हा शाखेत एवढे काम कमी आहे काय की आपला कामाचा वेळ सोडून ते खाजगी व्यक्तींसोबत बैठका करण्यात व्यस्थ आहेत.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण नावाचे अत्यंत हुशार आणि कोणाचीही शस्त्रक्रिया करण्यात अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्व ज्यांना माजी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी डॉक्टर ही उपाधी दिली. डॉक्टरकी करणे हा स्थानिक गुन्हा शाखेत एक महत्वाचा जबाबदारीचा प्रकार आहे. पण ही जबाबदारी पार पाडतांना त्या शस्त्रक्रियेतून कोणालाही त्रास होणार नाही, कोणालाही इजा पोहचाणार नाही, कोणाच्या मानसिकतेला धक्का लागणार नाही याचे लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असते.परमेश्र्वर चव्हाण यांची नियुक्तीच मुळात नियंत्रण कक्षात असतांना ते स्थानिक गुन्हा शाखेत कसे काम करतात. कोणात्या हजेरी पटावर त्यांची हजेरी आहे. त्यांचे पगार बिल कोणत्या विभागातून निघते. स्थानिक गुन्हा शाखेतून की, नियंत्रण कक्षातून असो.असे अनेक पोलीस आहेत ज्यांच्या कोठेच नोंदी नाहीत. या जगात सर्व काही चालत राहते त्याच प्रमाणे हे सर्व चालत आहे.
दि.24 जानेवारी रोजी नांदेड शहराच्या शेवटच्या कोपऱ्यात एका खाजगी व्यक्तीच्या कार्यालयात परमेश्र्वर चव्हाण आणि एक पत्रकार असे दोघे बरेच तास बसले होते. काय काम असेल तेथे, कदाचित कोणालाही न सांगता त्या ठिकाणी बसून कोणाची तरी शस्त्रक्रिया केली असणार? ही बाब स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरिक्षकांना कळू दिली की नाही हे सुध्दा समजले नाही. पोलीस निरिक्षकांना न कळविता शस्त्रक्रिया करण्यात सुध्दा डॉक्टर परेश्र्वर चव्हाण यांचा हातखंडा आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टरचे ऑपरेशन 24 जानेवारी रोजी सफल झाले की, नाही?