नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी रेल्वे ब्रिजजवळ एका महिलेच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून तिच्या जवळील 7 लाख 58 हजार 665 रुपयांचा सोन्या-चांदीचे ऐवज दोन चोरट्यांनी लांबला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरपंच नगर भागातून एका 59 वर्षीय महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चैन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावली आहे. अडीच तोळ्याची किंमत 70 हजार रुपये लिहिलेली आहे.
दत्ता त्र्यंबक शहाणे हे सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. त्यांचे मुळ गाव बोधडी(बु) ता.किनवट आहे. दि.28 जानेवारी 2024 च्या सायंकाळी 7 वाजता ते आणि त्यांची पत्नी दुचाकीवर समोर आपली सोन्या-चांदीच्या ऐवजाची बॅग घेवून परत बोधडीकडे जात असतांना बोधडी रेल्वे ब्रिजच्या अलीकडे दोन अनोळखी व्यक्ती, 25 ते 30 वयोगटाचे ज्यांनी पिवळ्या रंगाचे टिपके असलेले शर्ट परिधान केले होते. त्यांनी माझ्या व पत्नीच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून स्कुटीवर पायाजवळ ठेवलेली बॅग बळजबरीने चोरून नेली. ज्यामध्ये 3 लाख 99 हजार 288 रुपयांचे सोन्याचे दागिणे तसेच 2 लाख 94 हजार 367 रुपयांचे चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम 65 हजार रुपये असा 7 लाख 58 हजार 655 रुपयांचा ऐवज होता. किनवट पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 20/2024 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत नांदेड शहरातील सरपंचनगरच्या पिठाच्या गिरणीजवळ 28 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास 59 वर्षीय महिला पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांमधील मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून पळून गेले आहेत. या चैनची किंमत 70 हजार रुपये पोलीस अभिलेखात लिहिलेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 22/2024 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे अधिक तपास करणार आहेत.
किनवटमध्ये 7 लाख 60 हजारांची जबरी चोरी; नांदेड शहरात 59 वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठन तोडले