नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील मुळात राम मंदिर परिसरात राहणारे गोपीकिशन देवकरण शर्मा (पिपलवा) यांचे ऱ्हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. उद्या दि.31 जानेवारी रोजी त्यांची अंतिमयात्रा त्यांच्या आताचे निवासस्थान मगनपुरा येथून दुपारी 12 वाजता निघेल.
गोपीकिशन देवकरण शर्मा (पिपलवा) (वय 54) मुळात राम मंदिर परिसरात जन्माला आलेले आणि अत्यंत छोट्या वयात शिवा फर्टिलाझर या कंपनीत सेवक या पदावर आपल्या जीवनाची सुरूवात करून आज ते शिवा फर्टिलाझर या कंपनीत विक्री व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. आज दि.30 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास त्यांना ऱ्हदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी आपल्या जीवनाची यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नीसह मोठा परिवार आहे. गोपीकिशन शर्मा यांचे सुपूत्र कुणाल शर्मा आणि गोपीकिशन यांचे बंधू पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी माहिती दिली आहे की, गोपीकिशन शर्मा यांची अंतिम यात्रा उद्या दि.31 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या मगनपुरा, शुक्ला कॉम्प्लेक्स येथील निवासस्थानातून निघेल. त्यांच्यावर अंतिमसंस्कार रामघाट परिसरात केले जातील.