नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने दि.31 जानेवारी 2024 रोजी एक पोलीस महासंचालक, सहा अपर पोलीस महासंचालक यांच्यासह भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील 65 अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्याचे आदेश जाहीर केले आहेत. या आदेशावर गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी रितेशकुमार यांना पुणे पोलीस आयुक्तालय बदलून समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य या जागेवर पदोन्नती करून नियुक्ती दिली आहे. अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पोलीस आयुक्त पुणे शहर अशी नियुक्ती देण्यात आली आहे, अपर पोलीस महासंचालक आणि उपमहासमादेशक होमगार्ड मुंबईचे प्रभातकुमार यांना पद अवनत करून संचालक नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती दिली आहे. महाराष्ट्र वाहतुक विभागाचे डॉ.रविंद्रकुमार सिंघल यांना पोलीस आयुक्त नागपुर शहर अशी नियुक्ती दिली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त शिरीष जैन यांना पदोन्नती देवून आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अशी नियुक्ती पदोन्नती देवून देण्यात आली आहे.विशेष पोलीस महानिरिक्षक महिला व बाल अत्याचार विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई येथील दिपक पांडे यांना पदउन्नत करून आणि पदोन्नती देवून अपर पोलीस महासंचालक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग येथे नियुक्ती दिली आहे.
भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. निसार तांबोळी-विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशासन(सहआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई), ए.डी.कुंभारे-विशेष पोलीस महानिरिक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई (पोलीस सहआयुक्त वाहतुक बृहन्मुंबई), आर.एल.पोकळे-अपर पोलीस अधिक्षक गुन्हे पुणे शहर(पदोन्नती देऊन विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र), चंद्रकिशोर मिणा-अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई(पदोन्नतीसह विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई).
पोलीस महानिरिक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे आहेत. दत्तात्रय कऱ्हाळे-पोलीस सह आयुक्त ठाणे शहर(विशेष पोलीस महानिरिक्षक नाशिक परिक्षेत्र), संजय शिंदे-पोलीस सहआयुक्त पिंपरी चिंचवड(विशेष पोलीस महानिरिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), प्रविण पवार-विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र, नवीन मुंबई(पोलीस सहआयुक्त पुणे शहर), प्रविणकुमार पडवळ-पोलीस सहआयुक्त वाहतुक बृहन्मुंबई(विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई), संजय दराडे-विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशिक्षण व खास पथके(विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई), ज्ञानेश्र्वर चव्हाण-विशेष पोलीस महानिरिक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र(पोलीस सहआयुक्त ठाणे शहर) एन.डी.येनपुरे-विशेष पोलीस महानिरिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई(पोलीस सहआयुक्त नवी मुंबई), एन.डी.रेड्डी-पोलीस आयुक्त अमरावती शहर(पदउन्नत करून पदोन्नती देवून पोलीस आयुक्त अमरावती शहर), संदीप पाटील-पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र(पदोन्नतीसह विशेष पोलीस महानिरिक्षक नक्षल विरोधी अभियान नागपूर), विरेंद्र मिश्रा- अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई(छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरिक्षक पदोन्नतीसह), रंजनकुमार शर्मा-अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग पुणे शहर(पदोन्नतीसह विशेष पोलीस महानिरिक्षक आर्थिक गुन्हे शाखा गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य मुंंबई), नामदेव चव्हाण-पोलीस उपमहानिरिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे(विशेष पोलीस महानिरिक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपुर पदोन्नतीसह).
पोलीस उपमहानिरिक्षक दर्जाच्या बदल्या पुढील प्रमाणे आहेत. राजेंद्र माने-पोलीस आयुक्त सोलापूर शहर (सहसंचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), विनिता साहु-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड पुणे (अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई पदोन्नतीने), एम.राजकुमार-पोलीस अधिक्षक जळगाव(पदोन्नतीसह पोलीस आयुक्त सोलापूर शहर), बस्वराज तेली-पोलीस अधिक्षक सांगली (पदोन्नतीसह पोलीस उपमहानिरिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), शैलेश बलकवडे-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे (अपर पोलीस आयुक्त पुणे शहर पदोन्नतीसह), शहाजी उमाप-पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण (पदोन्नती घेवून अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई), एस.जी.दिवाण-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 16 कोल्हापुर(पदोन्नती घेवून पोलीस उपमहानिरिक्षक पोलीस दळण-वळण व माहिती तंत्रज्ञान पुणे), संजय शिंत्रे-पोलीस अधिक्षक सायबर मुंबई(पदोन्नतीसह पोलीस उपमहानिरिक्षक दक्षता, वस्तु व सेवा कर विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई), मनोज पाटील-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई(पदोन्नती मिळवत अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग पुणे शहर).
पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपआयुक्त यांच्या बदल्या विक्रम देशमाने-पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण (पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण), पंकज देशमुख-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी-पोलीस उपआयुक्त मुख्यालय-1 बृहन्मुंबई(पोलीस अधिक्षक जळगाव), अजयकुमार बन्सल -पोलीस आयुक्त बृहन्मुंबई(पोलीस अधिक्षक जालना), रविंद्रसिंह परदेशी-पोलीस अधिक्षक चंद्रपुर(पोलीस अधिक्षक परभणी), रागसुध्दा आर.-पोलीस अधिक्षक परभणी(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), संदीप घुगे-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(पोलीस अधिक्षक सांगली), मुमक्का सुदर्शन-पोलीस उपआयुक्त नागपुर शहर(पोलीस अधिक्षक चंद्रपुर), धोंडोपंत स्वामी-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई(पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण), पंकज कुमावत-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण), मितेश घट्टे-अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), विक्रम साळी-अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण (सहाय्यक पोलीस महानिरिक्षक नियोज व समन्वय पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई), आनंद भोईटे-अपर पोलीस अधिक्षक बारामती पुणे ग्रामीण (पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), संदीप पखाले-अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण(पोलीस अधिक्षक विशेष कृती गट नक्षलवाद विरोधी अभियान नागपूर), रमेश धुमाळ-सहाय्यक पोलीस महानिरिक्षक नियोजन व समन्वय पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई( अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण), समाधान पवार-सहआयुक्त दक्षता अन्न व औषधी प्रशासन मुंबई (पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), राहुल धर्मराज खाडे-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (सहाआयुक्त दक्षता अन्न व औषध प्रशासन मुंबई), मुकूंद बंकटराव आघाव-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (अपर पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर).
निमित्त गोयल-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर (पोलीस उपआयुक्त नागपूर शहर), राजेंद्रकुमार दाभाडे-पोलीस उपआयुक्त ठाणे शहर(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे), वैभव कलूबर्मे-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर(अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर, अहमदनगर), कविता नेरकर-पोलीस अधिक्षक सायबर महाराष्ट्र राज्य(अपर पोलीस अधिक्षक चाळीगाव,जळगाव), संजय जाधव-अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण व गृहरक्षक दल(अपर पोलीस अधिक्षक बारामती,पुणे ग्रामीण), स्वाती रामराव घोर-अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर(पोलीस अधिक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर), रमेश चोपडे-अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, जळगाव(अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), पराग मनेरे-उपआयुक्त विशेष सुरक्षा राज्य गुप्त वार्ता विभाग(पोलीस उपआयुक्त ठाणे शहर), संदीप जाधव-पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे(पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), हिम्मत हिंदुराव जाधव-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई पण रुजू नाही.(पोलीस उपआयुक्त पुणे शहर), अर्पणा सुधाकर गिते-पोलीस उपआयुक्त छत्रपती संभाजीनगर(प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर), दत्तात्रय बापु कांबळे-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), विशाल गायकवाड-पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक(पोलीस उपआयुक्त पिंपरी चिंचवड, पुणे), काकासाहेब आदिनाथ डोळे-पोलीस उपआयुक्त पिंपरी चिंचवड(पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक).
भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी बी.जी.शेखर हे नाशिक पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक होते त्यांच्या जागी दुसरा अधिकारी पाठवला आहे. परंतू त्यांना नवीन नियुक्ती राखीव ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने एक पोलीस महासंचालक सहा अपर पोलीस महासंचालक यांच्यासह राज्यातील एकूण 65 पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या नवीन नियुक्त्या