महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलावंताना कला सादर करण्याची संधी

नांदेड (जिमाका) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवाय्यांची माहिती इ. बाबी जनसाम्गन्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्याने शासनाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये 16, 17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये लोककला पोवाडा, भारुड, गोंधळ, वाघ्या मुरळी, भजन, जोगवा इ. लोकसंगीत शास्त्रीय गायन, लोकगीत, जात्यावरील ओव्या, भुलैय्या, गवळण व वादनाचे विविध प्रकार इ.
लोकनृत्य शास्त्रीय नृत्य, आदिवासी नृत्य, लोक उत्सव नृत्य, लावणी, कोळी नृत्य, धनगरी नृत्य व महाराष्ट्र परंपरेवर आधारित समुह नृत्य इ. कला प्रकारांचा समावेश असणार आहे.

या कला प्रकारात पारंगत असणाऱ्या स्थानिक कलावंतांनी 5 व  6 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचा कला प्रस्ताव जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी, पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावेत. या कालावधीत प्राप्त प्रस्ताव समितीद्वारे अंतिम करण्यात येतील. निवडक कलावंताना महासंस्कृती महोत्सवात सादरीकरण करण्यास अनुमती देण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या कलावंतांना समितीने मान्य केलेले एकत्रीत मानधन अदा करण्यात येईल. तथापी सादरीकरणासाठी लागणारे विविध साहित्य, वाद्य व वादक, पोषाख, सराव व इतर सामग्री स्वतः आणावी लागेल. त्यासाठी वेगळयाने निधी दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *