नांदेड(प्रतिनिधी)- हदगाव शहरात एक गॅस गोडाऊन फोडून चोरट्यांनी त्यातील 2 लाख 45 हजार 555 रुपये किंमतीचे 101 गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरून नेल्या आहेत. हा प्रकार 28 जानेवारीच्या सायंकाळी 5 ते 29 जानेवारीच्या दुपारी 4 वाजेपर्यंत घडला आहे. या बाबत बापूसाहेब पंडीतराव देशमुख यांच्या तक्रारीवरुन हदगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 22/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रायबोळे हे करणार आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय रुग्णालयाच्या पार्किंगमधून केरबा बाबाराव सोनटक्के यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. तसेच सन्मान प्रेस्टीज या इमारतीच्या वाहनतळातून शैलेश सुधाकरराव वैद्य यांची 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. या दोन्ही प्रकरणांबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. सोबतच 30 जानेवारीच्या दुपारी 12 ते 31 जानेवारीच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान महावितरणच्या पोलवरील 3 हजार मिटर ऍलीमिनीयम तारेची चोरी झाली आहे. या तारेची किंमत 63 हजार रुपये आहे. देगलूर पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला आहे.