नांदेड(प्रतिनिधी)-हुजूरी खालसा फायनान्सच्या चार जणांनी त्यांचे पैसे दिल्यावर सुध्दा आणखी 14 हजार रुपयांची मागणी केली आणि एका युवकाला नेऊन मारहाण केल्याचा जबरदस्त प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी एकूण 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
38 वर्षीय महिला चारुशिला राहुल धुताडे रा.मस्तानपुरा नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 जानेवारी रोजी चार अनोळखी युवक दुचाक्यांवर आले आणि माझा मुलगा सुमेध यास बळजबरीने पळवून नेले. पुढील माहिती तक्रारीत अशी लिहिली आहे की, हुजूरी खालसा फायनान्सचे माल जोगिंदरसिंघ, दिपुसिंघ, तेथील कर्मचारी असलम, तेजस दांडेकर आणि महिला प्राची यांच्यासह एकूण 9 जणांनी माझा मुलगा सुमेध यास मारहाण केली. धुताडे लिहितात त्यांचे घेतलेले सर्व पैसे आम्ही दिले होते. पण त्या पेक्षा जास्त 14 हजार रुपये अगाऊची मागणी होत होती. माझ्याा मुलास व माझ्या पतीला नेऊन मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन तुम्ही माझ्याकडून अधिकचे 5 हजार रुपये पण घेतले.
शिवाजीनगर पोलीसांनी या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 363, 364(अ), 324 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 42/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे.