नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रीय छात्रसेना(एनसीसी) च्या जवानांनी केलेल्या वाहतुक जनजागृती कार्यक्रमासाठी त्यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यात एनसीसीच्या युवक-युवतीनीं शहरात वेगवेगळ्या चौकात उभे राहुन वाहतुकी विषयी जनजागृतीची भुमिका उठवली. काही वाहनचालक त्यांना पाहुन हसत होते. काही त्यांच्या सुचनांचा सन्मान करत होते. अशा पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणा या युवक-युवतींनी वाहतुक जनजागृतीसाठी केलेल्या मेहनतीला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्या सर्वांना प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. या कार्यक्रमात पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड हे ही उपस्थित होते.
एनसीसीच्या युवक-युवतींचा सन्मान