नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने नियुक्तीला आलेल्या पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नांदेडला बदली झालेले अनेक नवीन पोलीस अधिकारी अद्याप हजरही झालेले नाहीत तरी त्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्या शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात परमेश्र्वर कदम, विमानतळ येथे शिवाजी गुरमे, शिवाजीनगर येथे जालिंदर तांदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुक आयोगाने दिलेल्याा निर्देशानुसार राज्यभर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी, राज्य सेवेतील पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहलीदार यांच्या बदल्यांचे आदेश निघतच आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या आणि नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन बदल्यांचे आदेश मागेच जारी झाले. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आलेले पोलीस निरिक्षक परमेश्र्वर बंकटराव कदम यांना वजिराबाद पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे, शिवाजी दत्तात्रय गुरमे यांना विमानतळ पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. सुनिल श्रीनिवास बिर्ला यांना किनवट पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे, जालिंदर आनंदा तांदळे यांना शिवाजीनगर पोलीस ठाणे मिळाले आहे, चंद्रकांत विनायक जाधव यांना पोलीस ठाणे कंधार येथे पाठविले आहे. शरद दामोदर जऱ्हाड यांना पोलीस ठाणे हिमायतनगर देण्यात आले आहे.
नवीन बदल्यांप्रमाणे जिल्ह्यात आलेल्या किंवा अजून न आलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पुढील प्रमाणे नियुक्ती दिली आहे. बळवंत साहेबअप्पा जमादार-शहर वाहतुक शाखा वजिराबाद, कल्पना अशोक राठोड-पोलीस ठाणे भोकर, रामेश्र्वर सखाराम तुरनर-पोलीस ठाणे शिवाजीनगर, फिरोजखान उस्मानखान पठाण-भाग्यनगर, विजयकुमार दत्ता कांबळे-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, बाळासाहेब मनोहर नरवटे-पोलीस ठाणे बिलोली, नौशाद पाशा पठाण-पोलीस ठाणे कंधार, नामदेव शिवाजी मद्दे-पोलीस ठाणे हिमायतनगर, बालाजी रामराव भंडे-पोलीस ठाणे किनवट, रमाकांत हनुमंतराव नागरगोजे- पोलीस ठाणे नागरगोजे(कॉपीपेस्टमध्ये झालेल्या गडबडीमुळे पोलीस ठाणे नागरगोजे लिहिले आहे. पण नांदेड जिल्ह्यात पोलीस ठाणे नागरगोजे अस्तित्वातच नाही.) विशाल दिपक भोसले-पोलीस ठाणे सोनखेड ते पोलीस ठाणे शिवाजीनगर, अश्रुदेव दिलीप पवार- पोलीस ठाणे मरखेड ते पोलीस ठाणे देगलूूूर, सोपान सोनाजी चिटमपल्ले-शहर वाहतुक शाखा वजिराबाद, राजू दत्ताराव वटाणे-पोलीस नियंत्रण कक्ष ते पोलीस ठाणे वजिराबाद.
नांदेड जिल्ह्यात नव्याने आलेले आणि नांदेड जिल्ह्यातत असलसेले पोलीस उपनिरिक्षक यांना पुढील प्रमाणे नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. यातील काही पोलीस उपनिरिक्षक फक्त बदली आदेशित आहेत. अद्याप नांदेडला हजर झालेले नाहीत. विश्र्वास सुधाकरराव खोले-पोलीस ठाणे कुंटूर,निता केरबाजी कदम-पोलीस ठाणे हिमायतनगर, प्रकाश अमृतराव पंडीत-नियंत्रण कक्ष नांदेड ते पोलीस ठाणे नायगाव, माधव अर्जुनराव लोकुलवार-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, मारोती माणिकराव फड-पोलीस ठाणे वजिराबाद, सय्यद अहमद सय्यद इसाक- पोलीस ठाणे इतवारा, रविंद्रकुमार शंकरराव दिपक-पोलीस ठाणे इतवारा, मंचक होणाजी फड-नियंत्रण कक्ष नांदेड ते पोलीस ठाणे मुखेड, संजय अभिमन्यु वळसे-पोलीस ठाणे मरखेल, सय्यद चॉंद सय्यद इब्राहिम-पोलीस ठाणे मुक्रामाबाद, मकसुद अहेमद पठाण-पोलीस ठाणे वजिराबाद, मोहम्मद अकबर मोहम्मद रजाक फारुख-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, पद्माकर गणपतराव पाठक-पोलीस ठाणे भोकर, राम राघोजी जगाडे-नियंत्रण कक्ष नांदेड ते पोलीस ठाणे इतवारा, सतिश विठ्ठलराव झाडे- पोलीस ठाणे मांडवी, दिलीप भानुदास मुंडे-पोलीस ठाणे बिलोली, दिनेश शिवाजीराव येवले-पोलीस ठाणे किनवट, प्रकाश निळकंठराव कुकडे-नियंत्रण कक्ष नांदेड ते पोलीस ठाणे भाग्यनगर, सुमेध शामराव बनसोडे- पोलीस ठाणे नाायगाव, अतुल विठ्ठलराव डाके-पोलीस ठाणे ईस्लापूर, सावित्रा नारायण रायपल्ले-पोलीस ठाणे बारड, शालीनी बापूराव गजभारे-नियंत्रण कक्ष नांदेड ते पोलीस ठाणे इतवारा, कृष्णा सखाराम सोनुळे-पोलीस ठाणे कुंटूर, प्रियंका गजानन पवार-पोलीस ठाणे धर्माबाद, बाळू भगवान चोपडे-शहर वाहतुक शाखा इतवारा, रामदास संभाजीराव श्रीमंगले-वाचक अपर पोलीस अधिक्षक कार्यालय भोकर ते पोलीस ठाणे भोकर, प्रकाश गणपतराव आवडे-पोलीस ठाणे भाग्यनगर.
नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यात आलेल्या नवीन पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या नियुक्त्या