बेरोजगार महिला उमेदवारांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी शनिवार 17 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांनी या विशेष रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.