नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात एका अल्पवयीन बालिकेला तिच्या आई-वडीलांनी कोयत्याने हल्ला करून मारुन टाकल्याचा “ऑनर किलींग’ प्रकार हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन बालिका आपल्या परिसरातील एका युवकाच्या प्रेमात जुळली. हा प्रकार माहिती झाल्यानंतर घरच्या लोकांनी त्या बालिकेला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतू काही महिन्यांपुर्वी ती बालिका त्या युवकासोबत पळून गेली. प्रियकराविरुध्द पोक्सो कायदानुसार गुन्हा पण दाखल झाला. अनेकांनी त्या मुलींचे समुपदेशन करून परत तिला आई-वडीलांकडे पाठविले. परंतू मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही. आपला अट्टहास तिने सोडला नाही. त्यामुळे समाजात आपली बदनामी होईल या संतापाने आई-वडीलांनी मिळून त्या मुलीला विळ्याने अनेक वार करून तिचा खून केला. घटनेची माहिती प्राप्त होताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. बालिकेचे शव वैद्यकीय परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. पोलीस या घटनेला सर्व बाजूने तपास करीत आहे.
हिमायतनगरमध्ये “ऑनर किलींग’; आई-वडीलांनी केला अल्पवयीन बालिकेचा खून