नांदेड(प्रतिनिधी)-श्री क्षत्रीय समाज यांच्यावतीने आज 31 वा सामुहिक विवाह मेळावा मोठ्या उत्साहात श्री खुशालसिंहनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यात 23 नवीन जोडप्यांचा विवाह समारंभ पार पडला.कार्यक्रमात अनेक संत, महंत, नेते मंडळी उपस्थित होते.
श्री क्षत्रीय समाज राजपुत श्री रेणुकादेवी मंदिर ट्रस्टच्यावतीने गेल्या 31 वर्षापासून सामुहिक विवाह मेळावे आयोजित केले जात आहेत. यंदाच्या विवाह मेळाव्यात नांदेडसह परभणी, हैद्राबाद, निर्मल, निजामाबाद, बुलढाणा जिल्ह्यातून वधु-वरांनी या मेळाव्यात नोंदणी केली होती. या मेळाव्याच्या उत्कृष्ट नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या विवाह समारोहाचे अध्यक्ष राजेशसिंह अग्निवंशी, सचिव गणेशसिंह कौंडल्य, बजरंगसिंह परिहार, रविंद्रसिंह सुर्यवंशी, खुशालसिंह कौशीक, सरदारसिंह परमार, कालूसिंह कौशीक, हनुमानसिंह गहलोत, कैनुरसिंह निकुंभ, परसरामसिंह विदेह, सुनिलसिंह परमार, उमेशसिह परमार, विक्रमसिंह काती आदींनी मागील बऱ्याच महिन्यांपासून या कार्यक्रमाच्या नियेाजनाची तयारी केली होती.
आज 4 जानेवारी रोजी सकाळी सर्व नवरदेवांची वरात रेणुकादेवी मंदिर(गाडीपुरा) ते श्री खुशालसिंहनगर येथे पोहचली. दिवसभर विविध कार्यक्रम झाले. सायंकाळी 6.35 वाजता अक्षदांचा कार्यक्रम झाला. त्यात श्री.ष.ब्र.प.108 डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, संतबाबा बलविंदरसिंघजी, संत हरीगिरी गुरू दत्तगिर महाराज, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आ.मोहनराव हंबर्डे, आ.बालाजीराव कल्याणकर, ऍड.मिलिंद एकताटे, अन्नपुर्णाबाई बैस, सौ.योगीता बारदवाज, दिपकसिंह रावत, भानुसिंह रावत, दिलीपसिंघ सोढी, सौ.प्रकाशकौर खालसा, रघुनाथसिंह बैस यांची प्रमुख उपस्थिती होती.हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
श्री क्षत्रीय समाजाच्यावतीने 31 वा सामुहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न