नांदेड(प्रतिनिधी)-लोहा ते गंगाखेड रस्त्यावर मौजे आडगावजवळ चार अज्ञात चोरट्यांनी एका व्यक्तीला लुटले आहे.वजिराबाद भागातील गोवर्धनघाट टेकडीच्या घरातून 50 हजार रुपये किंमतीच्या ऐवजाची चोरी झाली आहे. एका माथेफेरुने विस्तारीत यशवंतनगर पावडेवाडी येथे अनेक गाड्याफोडून एका गाडीतील 700 रुपये चोरले आहेत.
ज्ञानेश्र्वर सुरेश आडकलवार हे 3 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6.30 ते 7 वाजे दरम्यान लोहा ते गंगाखेड रस्त्यावर प्रवास करीत असतांना मौजे आडगाव फाट्याजवळ चार दरोडेखोरांनी त्यांना रोखून खंजीरचा धाक दाखवून त्यांच्याकडील माक्रो फायनान्स बचत गटाचे वसुल केलेले 25 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असा 33 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. लोहा पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा क्रमांक 31/24 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरिक्षक काळे ह्या करणार आहेत.
अशोक माधवराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गोवर्धनघाट टेकडी येथे त्यांचे घरकुल आहे. त्यांची पत्नी आणि सुन 26 जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळेत दुसऱ्या रुममध्ये स्वयंपाक करत असतांना कोणी तरी चोरट्यांनी एका रुमचा कडीकोंडा काढून आत प्रवेश केला आणि कपाटातील 49 हजार 900 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार नागमवाड हे करत आहेत.
राजेश माधव पैंजन रा.विस्तारीत यशवंतनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 फेबु्रवारीच्या रात्री 11 ते 4 फेबु्रवारीच्या सकाळी 4 वाजेदरम्यान या भागातील विविध चार चाकी गाड्यांच्याा काचा फोडून कोणी तरी माथेफेरुने 15 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. त्यांच्या ामुलाच्या ागाडीत ठेवलेले 700 रुपये सुध्दा काचाफोडून चोरले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी हाा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बोरकर अधिक तपास करीत आहेत.
लोहा जबरी चोरी, वजिराबाद घरफोडी, भाग्यनगर हद्दीत गाड्या फोडल्या