
नांदेड(प्रतिनिधी)-दि.2 फेबु्रवारी रोजी स्नेहनगर पोलीस वसाहतीत रेल्वे महाप्रबंधक निती सरकार, सौ.भाग्यश्री शशिकांत महारावरकर, सौ.स्नेहल श्रीकृष्ण कोकाटे, सौ.डॉ.गर्वितासिंह अबिनाशकुमार यांच्या उपस्थितीत पोलीस कुटूंबियांसाठी स्नेह मेळावा आणि हळदी -कुंकवाचा कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
दि.2 फेबु्रवारी रोजी पोलीस कुटूंबियांसाठी स्नेहनगर पोलीस वसाहतीत पोलीस कुटूंबियांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कुटूंब आणि पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांचे कुटूंबिय एकत्र विविध कार्यक्रम साजरा करतात आणि आपसात स्नेहभाव राखतात असा संदेश मिळाला.
रांगोळी स्पर्धेत महिला गटातून प्रथम क्रमांक सौ.प्रियंका गायकवाड यांना मिळाला. द्वितीय क्रमांक सौ.वर्षा सावने यांनी प्राप्त केला. तृतीय क्रमांक सौ.अनुराधा पवार यांनी मिळवला. महेंदी स्पर्धेत महिला गटातून प्रथम क्रमांक सौ.सुजाता आळंदीकर, द्वितीय सौ.पायल कांबळे आणि तृतीय क्रमांक सौ.सुचिता तेलंगे यांनी मिळवला. पाक कला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. बालिका शिवपुरे, द्वितीय कल्पना उमाप आणि तृतीय क्रमांक सौ.पुजा जाधव यांनी मिळवला. पाक कलेत उत्तेजनार्थ बक्षीस सौ.मिना बिरमवार यांनी मिळवले.

बाल गटातून रांगोळी स्पर्धेत प्रथम वर्ग रुद्राक्ष तेलंग, द्वितीय क्रमांक त्रिशा सावणे आणि तृतीय क्रमांक नेहा पांचाळ यांनी मिळवला. महेंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक साधना आडे, द्वितीय क्रमांक अंकिता पोतदार, तृतीय क्रमांक पुनम श्रीरामे यांनी मिळवला. यावेळी लक्की ड्रा पध्दतीने एक पैठणी साडी पमिता मलबाशिरसे यांना मिळाली.
3 फेबु्रवारी रोजी स्नेह मेळावा, हळदी-कुंकु कार्यक्रम, मनोरंजनात्मक सांस्कृतीक कार्यक्रमाचे आायोजन झाले. यात पोलीस कुटूंबियांनी आप-आपल्या कला सादर केल्या. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण रेल्वे महाप्रबंधक निती सरकार, सौ. भाग्यश्री शशिकांत महावरकर, सौ.स्नेहल श्रीकृष्ण कोकाटे, सौ.डॉ.गर्वितासिंह अबिनाशकुमार यांच्या उपस्थितीत झाले.

या कुटूंब मेळाव्याचे आयोजन गृहपोलीस उपअधिक्षक अश्र्विनी जगताप, महिला पोलीस निरिक्षक सुगावे, बारसे, पोलीस उपनिरिक्षक माया भोसले, माधुरी यावलीकर, प्रणिता बाभळे, प्रियंका आघाव, स्नेहा पिंपरखेडे, जयश्री गिरे, शेख हिना, ननवरे, गजभारे, देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शेख हिना, कोमल राठोड, रुक्मीनी कानगुले यांनी केले. हा कार्यक्रम जिल्हा पोलीस सदलाच्या पोलीस कल्याण विभागाने आयोजित केला होता.