नांदेड(प्रतिनिधी)-ऑगस्ट 2023 मध्ये झालेल्या 35 लाखांच्या चोरीतील एक गुन्हेगार पकडण्यात यश आले आहे.या चोरट्याकडून स्थानिक गुन्हा शाखेने 12 तोळे सोने आणि 500 ग्रॅम चांदी असा एकूण 8 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.ही माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
दि.2 ऑगस्ट 2023 रोजी सिडको भागातील सराफा व्यापारी प्रभाकर डहाळे आपल्या दुकानात आले आणि आपल्या हातातील बॅग दुकानाच्या काऊंटरवर ठेवून आपली दुचाकी योग्य स्थितीत तळ करण्यासाठी तिकडे गेले.तेंव्हा ही संधी साधून चोरट्यांनी त्यांची बॅग चोरली. या बॅगमध्ये 35 लाख रुपये किंमतीचे सोने-चांदी असा ऐवज होता. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 361/2023 दाखल झाला होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या आरोपींच्या शोधासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडीसा राज्यात जवळपास 15 दिवस मुक्काम केला होता. दरम्यान पोलीसांना या आरोपींची नांदेडमध्ये एक किरायणे घेतल्याची रुम असल्याची माहिती प्राप्त झाली. यावर पोलीसांनी करडी नजर ठेवली आणि नांदेडला आलेला भिमा धनु प्रधान (44) रा.पुरबाकोटे जि.जाजपूर राज्य ओडीसा याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा क्रमांक 561/2023 केल्याची कबुली दिली. त्यात गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या ऐवजापैकी 12 तोळे सोने आणि अर्धा किलो चांदी असाा एकूण 8 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त केला. या चोरी प्रकरणात भिमा प्रधान सोबत अजून 5 आरोपी होती ही माहिती पोलीसांनी जमा केली आहे आणि भिमा प्रधानला सध्या नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संग्राम केंद्रे, दिपक ओढणे, राजू सिटीकर, पद्मसिंह कांबळे, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगिरवाड, शेख कलीम, रेशमा पठाण, गजानन बैनवाड, ज्वालसिंग बावरी, महेश बडगु यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
35 लाखांच्या चोरीतील एक चोरटा पकडून स्थानिक गुन्हा शाखेने 8 लाख 12 हजारांचा ऐवज जप्त केला