
नांदेड (प्रतिनिधि)-जिल्ह्यात व शहरामध्ये मागील एक वर्षापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल आणि कत्तलीसाठी तेलंगणा राज्यामध्ये तस्करी सुरू आहे. यासंदर्भात मागील एक वर्षभरापासून सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून सुद्धा पोलीस प्रशासन कसायांच्या आणि तस्करांच्या विरोधात कठोर कारवाई करत नाही.
वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये 2015 साली प्राणी संरक्षण अधिनियम हा संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा लागु करण्यात आलेला आहे. माननीय पोलीस महासंचालक यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाने जनावरांच्या कारवाई दरम्यान काय काय केले पाहिजे यासंदर्भामध्ये मार्गदर्शक सुचना ( SOP ) दिलेल्या आहेत, तरीही या मार्गदर्शक सूचनांकडे सुद्धा दुर्लक्ष करून माननीय पोलीस महासंचालकांनी दिलेल्या ( SOP ) पोलीस अधिकारी व काही भ्रष्ट पोलीस कर्मचारी कसायांना कारवाईच्या अनुषंगाने असलेली महत्त्वपुर्ण गोपनीय माहिती सातत्याने पुरवत आहेत.
गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहून देखील गोहत्तीला विरोध करू नये म्हणून सातत्याने खच्चीकरण करण्याचं षडयंत्र नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन करत आहे. या वर्षभरामध्ये नांदेड जिल्ह्यात कसायांनी गोरक्षकांवर चार हल्ले केले आहेत . एका हल्ल्यादरम्यान एका गोरक्षकाचे बलिदान झाले तर एका गोरक्षक कार्यकर्त्याला तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आणि दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी दुसऱ्या एका गोरक्षक कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक गुन्हेगारीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, केवळ खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने तडीपारचा प्रस्ताव तयार करून नोटीस पाठवलेली आहे.
कसायांप्रति सहानुभूती आणि गोरक्षकां प्रति बदल्याची भावना आणि नांदेड जिल्ह्यात कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जात नसल्याच्या विरोधात हे उद्याचे धरणे आंदोलन आम्ही विश्व हिंदु परिषदेच्या वतीने करणार आहोत.