नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीला भुखंड खरेदीनंतर झालेल्या वादातून त्रास दिल्यामुळे त्याने आत्महत्या केली. या प्रकरणात डॉक्टर पती-पत्नीसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किर्ती रघुनाथ ताटे या शिक्षीका आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.5 फेबु्रवारीच्या दुपारी 4 वाजेच्यासुमारास त्यांचे पती रघुनाथ भुजंग ताटे (50) यांनी फाशी घेवून आत्महत्या केली. या फाशीचे कारण आपल्या तक्रारीत नमुद करतांना शिक्षीका किर्ती ताटे यांनी नमुद केले आहे की, खरेदी खत क्रमांक 6 गट क्रमांक 169 तरोडा (खु) हे खरेदी खत क्रमांक 2141/2022 नुसार खरेदी केला होता. त्याचा दिवाणी दावा क्रमांक 109/2022 दाखल झाला. हा भुखंड डॉ.प्रमोद अन्सापुरे आणि डॉ.वैशाली अन्सापुरे आणि त्यांचे इतर नातलगांकडून खरेदी केला होता. आमचा भुखंड आम्हाला देत नाही तर 40 लाख रुपये दे, नाही तर तु मरुन जा नंतरच आम्हाला आमचा भुखंड मिळेल असा त्रास देत होते.या त्रासाला कंटाळूनच रघुनाथ ताटे यांनी 5 फेबु्रवारी रोजी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. भाग्यनगर पोलीसांनी डॉ.प्रमोद अन्सापुरे, डॉ.वैशाली अन्सापुरे, नागमणी अन्सापुरे तिघे रा.वसंतनगर नांदेड आणि शंकर अन्सापुरे रा.पुणे या चार जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 38/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सिंगनवाड हे करीत आहेत.
एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभुत डॉक्टर पती-पत्नीसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल