नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी गस्तीच्यावेळेस दोन जणांना पकडून त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या आहेत. त्या दोघांपैकी एक जण विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. दोघांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे जण लग्नाच्या वरातीत तलवार घेवून डान्स करत होते.
पोलीस अंमलदार देविदास बापूराव बिसाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार मोहन हक्के, दासरवाड, देशमुख असे गस्त करत असतांना रात्री 10.30 वाजेच्यासुमारास शास्त्रीमार्केट ते लोहारगल्ली जाणाऱ्या रस्त्यावर विजय सत्यप्रकाशसिंह ठाकूर (21) हा आणि एक दुसरा 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक दोघे आपल्या हातात तलवार घेवून लग्नाच्या वरातीत डान्स करत होते. या दोघांना पकडून पोलीसांनी त्यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 36/2024 दालख केला आहे.
वरातीत तलवार घेवून नाचणे महागात पडले