नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने 1956 च्या गुरुद्वारा बोर्ड कायदा पुर्णपणे बदलून नव्याने लागू केलेल्या कायद्यात संपुर्ण सिख समाजाचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही मोर्चा आणि धरणे आंदोलन करणार आहोत असे निवेदन सिख समाजाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना देण्यात आले.
दि.5 फेबु्रवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासानाने भाटीया समितीच्या शिफारसीनुसार नवीन गुरुद्वारा बोर्ड कायदा अंमलात आणण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला.या नवीन कायद्याच्या विरोधात फक्त नांदेडच नव्हे तर भारतभरातील सिख समाजाने निषेद व्यक्त केलेला आहे. या गुरुद्वारा कायद्याच्या विरोधात सचखंड श्री हजुर साहिब येथील पंचप्यारे साहिबांनी सुध्दा गुरूमता (ठराव) घेवून शासनाला 2019 आणि 2023 मध्ये पाठवलेला आहे.आज सिख समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात उद्या दि.9 फेबु्रवारी रोजी गुरुद्वारा गेट नंबर 1 सामोरून संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा गुरुद्वारा चौरस्ता, हल्लाबोल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल तेथे सिख समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येईल आणि 2027 च्या नवीन गुरुद्वारा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात येईल.
नवीन गुरूद्वारा बोर्ड कायद्याविरोधात उद्या मोर्चा व धरणे आंदोलन