माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-माता रमाई यांची 126 वी जयंती नांदेड शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विशेष करून मुलींनी, महिलांनी आपल्या आईचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. युवकांचा सहभाग सुध्दा तेवढाच महत्वपुर्ण होता.
काल 7 जानेवारी रमाई भिमराव आंबेडकर यांचा जन्मदिन. यंदाच्या वर्षी युवक-युवतींनी वेगवेगळे कार्यक्रम राबवून रमाई जन्मोत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, काही ठिकाणी शरब, काही ठिकानी अन्नदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सार्वजनिक भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनात डॉ.आंबेडकरनगर त्रिरत्न बौध्द विहार येथून डि.जे.तालावर युवती आणि महिलांनी नृत्यकरत आपल्या माईचा जन्मदिन साजरा करत मिरवणूक काढली. रमाई जयंतीची मिरवणूक नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच काढण्यात आली. ही मिरवणूक अत्यंत शांतते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आल्यानंतर मिरवणूकीचे विसर्जन झाले. या मिरवणूकीत इतरही नगरातील युवक-युवतींनी आप-आपल्या डि.जे.सह आनंद व्यक्त केला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या मिरवणूकीत शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून भरपूर परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *