नांदेड(प्रतिनिधी)-केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या परिक्षेत नांदेड जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यातील एक सिध्दांत चंद्रकांत वगर हे आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाने आपल्या येथे रिकाम्या असलेल्या जवळपास 1500 जागांसाठी जाहीरात काढली होती. त्यात जवळपास 13 ते 14 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. पहिल्या यादीत 65 हजार विद्यार्थ्यांना शॉटलिस्ट करण्यात आले. त्यानंतर लेखी परिक्षा आणि मुलाखत आणि विविध चाचण्या घेतल्यानंतर सर्व रिकाम्या जागा भरण्यात आल्या आहेत. या जागांमध्ये महाराष्ट्रातील 33 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यात नांदेडचे सिध्दांत चंद्रकांत वगर यांच्यासह इतर दोन जण आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांनी सर्वत्र अभिनंदन होते आहे. वास्तव न्युज लाईव्ह त्यांच्या भविष्यातील जिवनासाठी शुभकामना व्यक्त करत आहे.
सिध्दांत चंद्रकांत वगर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या परिक्षेत यशस्वी