गुरुद्वारा बोर्ड अधिनियम विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजीसह प्रचंड मोर्चा धडकला

 

नांदेड,(प्रतिनिधी)-सचखंड गुरुद्वारा सरकारने ताब्यात घेण्याचा घाट घातला असून त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने गुरुद्वारा अधिनियम 2024 च्या संमत केला आहे हा कायदा लोकशाहीची हत्या करणारा असल्याचा आरोप करीत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शीख समाजाकडून प्रचंड मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 च्या विरोधात शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा गेट नंबर एक पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिख समाजाने प्रचंड मोर्चा काढून विरोध करण्यात आला. सचखंड गुरुद्वारा येथील मुख्य जथेदार बाबा कुलवंतसिंग यांनी अर्दास करून कारसेवावाले बाबा बलविंदरसिंग, माता साहेबचे बाबा तेजासिंग, केसगड चे जत्थेदार सरदार सुलतान सिंग तसेच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष हरिजिंदरसिंग धामी, सचिव राजेंद्रसिंग मेहता व अकाली दलचे उपाध्यक्ष दलितसिंग चिमा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली. नवीन कायद्याच्या विरोधात नांदेडसह हैदराबाद, करीमनगर, निजामाबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी येथील शिख समाजाचा प्रचंड घोषणाबाजीसह मोर्चा काढण्यात आला

गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट 1956 मधील कलम 11 मधील संशोधन करून राज्य शासन नियुक्त अध्यक्ष करण्याची तरतूद करण्यात आली होती. याला सर्व समाजातून वारंवार विरोध दर्शविण्यात होता. सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी निवडणूक संदर्भात कोर्टामध्ये याचिका देखील दाखल केली होती. तरीही जनभावनेच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 संमत करण्यात आला आहे. हा कायदा लोकशाहीची हत्या करणारा असून जनभावने विरोधात असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले.

यावेळी सचखंड गुरुद्वाराचे मितग्रंथी गुरमितसिंग, कथा वाचक सरबजितसिंग निर्मले, परमजीतसिंग रहेरशिया, गुरुदीपसिंग ग्रंथी, सूरींदरसिंग मेंबर, शेरसिंग फौजी, रविद्रसिंग मोदी, गुरमीतसिंग महाजन, मनप्रीतसिंग कुंजीवाले, राजेंद्रसिंग पूजारी, जगदीपसिंग नंबरदार, गुरप्रीतसिंग सोखी, किरपालसिंग हजुरिया, जरबिरसिंग धुपिया, अवतारसिंग पेहेरदार, रविंदरसिंग बुंगई, जसबिर सिंग बुंगई, राजसिंग रामगडीया, मनबिरसिंग ग्रंथी, महींदरसिंग पैदल, भागींदरसिंग घडीसाज, जसपालसिंग लांगरी जर्नेलसिंग गाडीवाले, तेजपालसिंग खेड, राजेंद्रसिंग शाहू, गुरमीतसिंग बेदी, वीरेंद्रसिंग बेदी, तेजासिंग बावरी, हरभजनसिंग दिगवा, गुरदिप सिंग संधू, हरजितसिंग गिल, अमरजीतसिंग गिल, अमरजीतसिंग महाजन, गुरमीतसिंग डिंपल नवाब, महेंद्रसिंग लांगरी, प्रेमजितसिंग शिलेदार, देवेंद्रसिंग मोटरवाले, जगजीतसिंग, रवींद्रसिंग पुजारी, हरभजनसिंग पुजारी, गुरुदीपसिंग संधू , प्रतापसिंग खालसा, राजसिंग रामगडिया, जसबीरसिंग बुंगई, दीपकसिंग गल्लीवाले, चरणसिंग हैदराबाद, मनप्रीतसिंग कारागीर यांच्यासह हजारो शिख समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *