पक्षाने संधी दिल्यास नांदेड लोकसभा लढविणार-ऍड.अविनाश भोसीकर
नांदेड(प्रतिनिधी)-ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून राज्यात मोठे ओबीसीचे संघटन उभा केले असून ओबीसी आरक्षण बचाव या लढ्यासाठी ही संघटना काम करत आहे. मात्र आमच कोणत्याही राजकीय पक्षाने मत ऐकून घेतल नसल्यामुळे आम्हाला राज्यातील प्रस्तापितांच्या विरोधात राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी ओबीसी बहुजन मोर्चाची स्थापना करावी लागली. आगमी लोकसभा निवडणुका मराठवाड्यातील सर्वच आठही जागा ताकतीने लढवणार आहोत, असे मत ओबीसी बहुजन मोर्चाचे मराठवाडा संघटक ऍड.अविनाश भोसीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना साांगितले.याच बरोबर पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर नांदेड लोकसभा ताकतीने लढविणार असल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे, बसव बिग्रेड जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुऱ्हाडे, बसव बिग्रेडचे शहराध्यक्ष ज्ञानेश्र्वर बोंबले, राजू बोंबले यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी ऍड.भोसीकर पुढे बोलतांना म्हणाले की, ओबीसी समाजाने आजपर्यंत प्रस्तापितांचे पिड्यान पिड्या आम्ही सतरंज्या उचललोत आहोत. एकाच कुटूंबातील तीन पिड्यांना आम्ही मतदान करत आलाोत. अजूनही आम्ही तुम्हालाच मतदानच करायच का? आम्ही कधी निवडणुका लढवायच्या की नाही असा प्रश्नही त्यांनी केला.
ओबीसी बहुजन मोर्चाच्या पक्षाची घोषणा 5 फेबु्रवारी रोजी मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेेंडगे यांनी घोषणा केली. यावेळी प्रा. टी.पी.मुंडे, चंद्रकांत बावकर, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह अन्य जण उपस्थित होते. यावेळी माझ्यावर मराठवाडा संघटक म्हणून जबाबदारी दिली आणि मी तेंव्हापासूनच कामाला लागलो आहे. राज्यातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वच निवडणुका आम्ही येणाऱ्या काळात लढविणार आहोत. ओबीसी समाजासाठी एक व्यासपीठ तयार झाल असून आता ओबीसीच मतदान ओबीसीलाच हा नारा घेवून आम्ही समोर जज्ञात आहोत असे मत ऍड. अविनाश भोसीकर यांनी व्यक्त केले.
ओबीसी बहुजन मोर्चा मराठवाड्यातील सर्व लोकसभेच्या जागा लढवणार