नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाावसासह गारांचा पाऊस

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होवून दि.11 रोज रविवारी दुपारी अवकाळी पावसासह गारांचा पाऊस पडल्याने मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना हिमायतनगर, उमरी तालुक्यात घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला असल्याने पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे.
रविवार दि.11 रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास जिल्ह्यातील अनेक भागात वाऱ्यासह अवकाळी पावसााने हजेरी लावली. यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील पोटा सरसम, तामसा तसेच जवळगाव, कामारी, याचबरोबर उमरी तालुक्यातील शेळगाव, गोळेगाव, कारेगाव, नागठाण यासह अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात पावसाने हजेरी लावली. याचबरोबर वाऱ्यासह गाराही मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे शेतात असणाऱ्याा गहु, केळी, हरभरा यासह अन्य पिकांची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली आहे.
दुपारी 4 च्यासुमारास सुरूवातीला वातावरणात बदल झाला. यामध्ये जोरदार वारे येवून पावसास सुरूवात झाली. अचानक पावसासोबत गाराही टपकू लागल्यामुळे नागरीकांसह शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. हा पाऊस तब्बल अर्धा तास पडला असल्याची माहिती या गावातील नागरीकांनी दिली. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून या भागातील अनेक केळी बागायतीदारांचेही नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली. तसेच उमरी तालुक्यात टरबुज हे पिक मोठ्या प्रमाणात लावले जाते. गारांमुळे टरबुज शेती पुर्णताह लाले-लालच दिसू लागली होती.
यात जिवीत हाणी झाली नसल्याची घटना सध्या तरी प्रशासनाकडे सांगण्यातत येत असली तरी मोठ्याप्रमाणात जनावरे दगावल्याची माहिती शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहे. एकंदरीत शेतकरी हा या पावसामुळे पुर्णता: हवालदिल झाला असून या अगोदरच्या अवकाळी पावसातही शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होते. मात्र शासनाने अद्यापही त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली नाही. आता या नुकसानीचे काय होणार या चिंतेत सध्या शेतकरी आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला भरीव आर्थिक तरतुद द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यातून होत असल्याची चर्चा समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *