साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादिगा या समाजातील दारिद्र रेषेखालील महिला, पुरुष घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावासाठी महामंडळामार्फत वेबसाईट प्रणाली विकसित केली आहे. तरी मातंग समाजातील गरजु लाभार्थ्यांनी या “https://beta.slasdc.org” संकेतस्थळावर अर्ज भरावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

 

 

या योजनेअंतर्गत सुविधा कर्ज योजना 5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना 1 लाख 40 हजार रुपये, महिला समृध्दी योजना 1 लाख 40 हजार रुपये, शैक्षणिक कर्ज योजना देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 30 लाख रुपये व परदेशातील अभ्यासक्रमासाठी 40 लाख रुपयापर्यतचे कर्ज प्रस्ताव सादर करता येतील. लाभार्थ्यांनी आपले कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या संकेतस्थळ (Portal) वर ऑनलाईन पध्दतीने जिल्हा कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. महामंडळाचे संकेतस्थळ 5 मार्च 2024 रोजी बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टि.आर.शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील कार्यालयात येऊन संपर्क साधावा, असेही महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *