नांदेड(प्रतिनिधी)-राजा भिकाऱ्यासारखा वागू लागू लागला तर तो आपलेच नाव खराब करत नाही तर त्या समुदायाचे सुध्दा नाव खराब करतो. ज्याच्यामधून तो राजा झाला. नाव राजा असले तरी त्याप्रमाणे वागता आले नाही तर आई-वडीलांनी केलेली चुक होती असेच म्हणावे लागेल. पत्रकारीतेत असेच काही महाभाग आहेत.ज्यांच्या बद्दल आम्ही हे लिहित असलो तरी याचा आधार 50 च्या दशकात जन्मलेल्या सआदत हसन मन्टो यांच्या शब्दांचा आहे.
सआदत मन्टो असे म्हणतात की, “कोठे की एक तवायफ और एक बिका हुवा पत्रकार एकही श्रेणी में आते है। लेकीन इनमें तवायफ की इज्जत ज्यादा होती है।’ मन्टोंच्या या शब्दांना आम्ही अनेक वेळेस वापरले आहे. तरी पण भिकारचोट पत्रकारांवर याचा काही परिणाम झाला नाही असे वाटते म्हणून आज पुन्हा एकदा हे शब्द वापरले आहेत.
एका वृत्तवाहिनीतून पैसे उकळण्याचा धंदा समोर आल्यानंतर त्या वृत्तवाहिनीने त्या पत्रकाराची हकालपट्टी केली. इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या सर्व सदस्यांचा मी एकटाच बॉस असल्याचे तो दाखवत असे. जणू नांदेड जिल्हा माझ्याच इशारावर चालतो असे त्याला वाटत असे.पण हा भ्रम असतो. तो गेल्यावर लोक त्याच्याबद्दल काय म्हणायचे याची बहुदा कल्पना त्याला कधी आलीच नाही आणि म्हणूनच तो स्वत:ला मोठा व्यक्ती समजत असे.
वृत्तवाहिनीने हकालपट्टी केल्यानंतर सुध्दा त्याच वृत्तवाहिनीच्या नावावर पैसे उकळण्याचा धंदा आजही सुरूच आहे. काही जुगार माफिया, काही वाळू माफिया असे 2 नंबरचे काम करणारे व्यक्ती त्याला दुजोरा देत आहेत. कारण त्यांच्याकडून दोनचार लोकांनी असे पैसे घेतले तर त्यांनाही काही देण्यात वाईट वाटत नाही. या भिकारचोट पत्रकाराने वृत्तवाहिनीने काढल्यानंतर आमच्या सुध्दा गुन्हा दाखल केला. परंतू विजय नेहमी सत्याचाच होतो. हे आम्ही म्हणण्याऐवजी सर्वश्रुत आहे. त्यातही आमचाच विजय होईल. एका प्रादेशिक पोर्टलवर जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काकाची त्याला साथ होती. परंतू आमच्या बातमीनंतर त्या पोर्टलने सुध्दा त्याची दाळ शिजू दिली नाही. लोकांनी समजून घेण्याची गरज आहे की, आज तो पत्रकार नाही. मग पैसे कसे देता. मुळात पत्रकारांना पैसे द्यायचेच नसतात. पण आपले काही चांगले लिहावे यासाठी हा पैसांचा खेळ सुरू झाला. आजही तो राजा भिकारचोटपणा करतच आहे. वृत्तवाहिनीचे नाव सांगून आजही वसुली करतच आहे.
शिष्यही तसेच
भिकारचोटपणा करण्यात माहिर असलेल्या या राजाला दाजी म्हणणारा एक शिष्यदेखील त्याच्याच पद चिन्हावर चालतो पण त्याला पैशांऐवजी इतरांकडून मद्य आणि अद्रक, लसुनसह पातळ रस्याचे मटन आवडते. हिंदी वृत्तवाहिनीमध्ये हा पत्रकार स्वत:ला सर्वात प्रथम खबर देणारा व्यक्ती असे जाहीर करतो. तरीपण मटनचा रस्सा आणि मद्य या संदर्भाने त्याचे नाव आज नामांकित झाले आहे.नांदेडपासून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर असलेल्या धाब्यांचे मालक त्याला ओळखतातच. अशा परिस्थितीत मटन आणि दारुसाठीच पत्रकारीता करणाऱ्या या पत्रकाराची किव करावी तेवढीच कमी.हे लिहितांना सुध्दा आम्ही हसन मन्टोचे वाक्य पुन्हा उल्लेखीत करू इच्छीतो ते म्हणतात “निम के पत्ते कडवे ही सही, खून तो साफ करते है।’
वृत्तवाहिनीतून काढलेल्या भिकारचोट राजाचे इतिवृत्त