नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाच्या नवीन कायद्याविरुध्द सुरू असलेल्या धरणे आंदोलनाबाबत अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या स्वाक्षरीनंतर ते पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविण्यात आले आहे.
दि.5 फेबु्रवारी रोजी महाराष्ट्र राज्याने गुरूद्वारा बोर्ड अधिनियम कायदा 1956 ऐवजी अधिनियम 2024 लागू केला. या कायद्याबद्दल सिख समाजामध्ये पुर्वीपासूनच नाराजी होती. यासाठी अनेक निवेदने देण्यात आली. पंचप्यारे साहिबान यांनी गुरुमता (आदेश) जाहीर करून तो सुध्दा शासनाला पाठविण्यास सांगितला होता. परंतू गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षक आणि कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे तो गुरुमता 8 फेबु्रवारी रोजी शासनाकडे प्राप्त झाला. त्या अगोदरच राज्य शासनाने नवीन अधिनियम मंजुर करून घेतला होता.
अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या स्वाक्षरीने 9फेबु्रवारी पासून सुरू असलेल्या सीख समाजाच्या धरणे आंदोलनाबाबतचे सरदार मनप्रितसिंघ कुंजीवाले आणि सरदार गुरमितसिंघ बेदी यांचे निवेदन सुध्दा शासनाकडे पाठविले आहे. आजही हे धरणे आंदोलन सुरूच आहे.
गुरुद्वारा बोर्ड कायद्याविरुध्द सिख समाजाचे धरणे आंदोलन सुरूच