नांदेड ( जिमाका ):- नांदेडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा सोमवारी प्रवीण टाके यांनी पदभार स्वीकारला. प्रवीण टाके हे नागपूर येथून नांदेड येथे या पदावर रुजू झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या बदली आदेशानंतर यापूर्वीचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे नागपूर येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या जागेवर प्रवीण टाके यांनी आज पदभार सांभाळला. प्रवीण टाके यांनी यापूर्वी नवी दिल्ली, मुंबई, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी व समकक्ष पदावर काम केले आहे. यापूर्वी लोकमत, सामना तरुण भारत, नागपूर पत्रिका आदि वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले प्रवीण टाके एक प्रतिभावान कवी,लेखक असून त्यांची फकीर ही कादंबरी प्रकाशित आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर त्यांनी स्तंभलेखन केले आहे.
Related Posts
लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (प्रतिनिधी) – ग्रामीण व दुर्गम भागासह सर्व लोकांची शासनाशी संबंधित असलेली सर्व कामे पारदर्शक पद्धतीने व निर्देशीत केलेल्या कालावधीत…
हदगाव येथील दरोडा प्रकरणात 11 लाख 74 हजारांचा ऐवज जप्त
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने हदगाव येथील प्रमोद शेट्टी यांच्या घरात झालेल्या दरोडा प्रकरणातील 11 लाख 74 हजार रूपयांचा…
बोगस बन्नाळीकर हॉस्पीटलची मान्यता रद्द करा; गौतम जैन यांची मागणी
नांदेड(प्रतिनिधी)-बन्नाळीकर यांचे बोगस हॉस्पीटलची मान्यता रद्द करून फौजदारी कार्यवाही करावी असा अर्ज नांदेडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना गौतम जैन यांनी दिला आहे.…