नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जवळपास 4.550 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करून त्या बाबतचा गुन्हा दाखल केला आहे.
12 फेबु्रवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुपारी 2 वाजेच्यासुमारास अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील संपुर्ण तरतुदींचा पाठपुरावा करत पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, रणधिर राजबन्सी, धम्मानंद जाधव, गणेश धुमाळ, शेख महेजबीन, दादाराव श्रीरामे, राजू पुल्लेवार आणि हनुमानसिंह ठाकूर असे मौजे असर्जन येथील क्रांतीनगर जवळ पोहचले. त्यांच्यासोबत राजपत्रीत अधिकारी, शासकीय पंच तयार होते. तेथे पोहचून आपला परिचय दिला आणि शासकीय कामाला सुरूवात केली.
त्या ठिकाणी 157 पॉकिटांमध्ये एकूण 1 किलो गांजा भरलेला होता. त्याची किंमत 20 हजार रुपये आहे. दुसऱ्या एका पिशवीत 3 किलो 550 ग्रॅम गांजा सापडला एकूण गांजाची 20 हजार रुपये प्रति किलो प्रमाणे किंमत 91 हजार रुपये झाली. सोबतच तेथे सापडलेला माधव बालाजी उबाळे (40) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलमानुसार गुन्हा क्रमांक 114/2024 दाखल करण्यात आला. या प्रकरणात अजून काही लोकांचा सहभाग आहे काय? या संबंधाचा शोध सुध्दा पोलीस विभाग घेत आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने 4 किलो 550 ग्रॅम गांजा पकडला