नांदेड(प्रतिनिधी)-आपला पुढील राजकीय प्रवास दोन दिवसानंतर जाहीर करेल असे सांगितल्यानंतर आज 24 तास पुर्ण होण्याअगोदरच अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये स्विच ओव्हर केला आहे. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भारतीय जनता पार्टीची यादी आजच जाहीर होणार आहे. म्हणजे हा स्विच ओव्हर पुर्णपणे क्लिअर झाला.
दोन पिड्यापासून कॉंगे्रसच्या छत्राखाली राजकीय प्रवास पुर्ण करणाऱ्या अशोक शंकरराव चव्हाण यांनी काल दि.12 फेबु्रवारी रोजी कॉंगे्रस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला त्यामुळे राज्यभर एकच खळबळ माजली. आपल्या वडीलांप्रमाणे नवीन राजकीय पक्ष अशोक चव्हाण तयार करतील काय असाही मुद्दा समोर आला होता. परंतू त्यांच्या राजीनाम्यानंतर राजीनामा देण्याची सत्र काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच थांबले. आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या सोबत अशोक चव्हाणांनी मी भारतीय जनता पार्टीत सदस्य होण्याची फिस भरून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे असे जाहीर केले आहे.
सबका साथ सबका विकास या नरेंद्र मोदींच्या वाक्याला गृहीत मानुन मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. मागे काही दिवसांपुर्वीच तेलंगणा राज्यात कॉंगे्रस पक्षाचा विजय झाला त्यात बहुमोल वाटा अशोक चव्हाणांचा होता. नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेचा प्रवेश झाला तेंव्हा अशोक चव्हाण त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते परंतू आता तेच कॉंगे्रस तोडा या शब्दांचे जनक झाले आहेत. पत्रकार परिषदेमध्ये आपली भुमिका स्पष्ट करतांना त्यांच्या तोंडून चुकून कॉंगे्रसच निघाले. त्यावर हस्या पिकला. मी पक्ष देईल ते काम करणार हे सांगत असतांना पत्रकारांनी केलेल्या गोंधळता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाणांचा उपयोग कसा करायचा ते भारतीय जनता पार्टीला माहित आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजच भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राची राज्यसभा यादी जाहीर होणार आहे. त्यात अशोक चव्हाणांचे नाव असणारच राज्य सभेचे खासदार झाल्यानंतर केंद्राचे मंत्री पद सुध्दा अशोक चव्हाणांना दिलेल जाण्याची शक्यता आहेच. सोबतच पुढे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदार संघाच्या जागा निवडुण आणण्याची जबाबदारी त्यांना देण्यात येईल असे एकंदरीत दिसते आहे.
24 तास पुर्ण होण्याअगोदरच अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये स्विच ओव्हर