नांदेड(प्रतिनिधी)-कृषी विस्तार अधिकारी वर्ग-3 परिक्षेमध्ये संशयास्पद कृती केली म्हणून दोन जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 34 सह 7 आणि 8 परिक्षा अधिनियम 1987 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजय राजेश नितीवार हे जिल्हा परिषद विभागामध्ये कृषी विस्तार अधिकारी आहेत.10 ऑक्टोबर 2023 रोजी विष्णुपूरी येथील होराईझन इंटरनॅशन स्कुल येथे कृषी विस्तार अधिकारी वर्ग-3 या पदासाठी परिक्षा होत्या. यामध्ये किरण साहेबराव कोल्हे आणि गजानन श्रीरंग लोहाटे दोघे रा.खापरखेडा ता.वसमत जि.हिंगोली हे परिक्षार्थी होते. परिक्षेदरम्यान संशयास्पद हालचाली केल्या आणि परिक्षेसंदर्भात कॉपी करून गैरकृत्य केले. यासाठी त्यांच्याविरुध्द 14 फेबु्रवारी 2024 रोजी हा गुन्हा क्रमांक 118/2024 दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
कृषी विस्तार अधिकारी परिक्षेत कॉपी करणाऱ्या दोन परिक्षार्थ्यांवर गुन्हा दाखल