नांदेड(प्रतिनिधी)-माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दि.12 फेबु्रवारी रोजी कॉंगे्रस पक्षाला रामराम करून भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ राज्यातील अनेक कॉंगे्रस कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यात प्रदेश कॉंगे्रस कमिटीच्या सरचिटणीस तथा सोशल मिडीया या पदाचा राजीनामा जयमाला ढाणकीकर यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कॉंगे्रस पक्षात एकनिष्ठेने काम करणाऱ्या जयमाला ढाणकीकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहोत. ते ज्या पक्षात जातील त्यांच्यासोबत आपण काम करणार असल्याचे साांगितले. 13 फेबु्रवारी रोजी कॉंगे्रस प्रदेश सोशल मिडीया प्रदेशाध्यक्ष यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते कॉंगे्रस पक्षात अनेक वर्षापासून काम करत असून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी नारायणराव ढाणकीकर यांच्या त्या कन्या आहेत व अशोक चव्हाण यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत.
जयमाला ढाणकीकर यांचा कॉंगे्रस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा