वकील संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोदमगावकरसह दोघांविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

नांदेड(प्रतिनिधी)-भुमिअभिलेख कार्यालयात जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोदमगावकर यांनी एका अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला शिवीगाळ केल्याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द ऍट्रॉसिटी कायदा आणि भारतीय दंड संहितेची कलमे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार शेषराव दत्तात्रय जेठेवाड (70) रा.विद्युतनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वारसा नोंदणी कार्यवाही संबंधाने जिल्हा भुमि अभिलेख कार्यालय नांदेड येथे 30 जानेवारी 2024 रोजी सुनावणी होती. त्यावेळी न्यायाधीशांसमोर ऍड.आशिष गोदमगावकर हे अडथळा निर्माण करत होते. त्यावेळी फिर्यादी शेषराव जेठेवाड यांनी मला अडथळा आणू नका अशी विनंती ऍड.आशिष गोदमगावकर यांना केली असतांना  आशिष गोदमगावकर यांनी अर्वाच्च शिवीगाळ करत डुकरा, कुत्र्या, तुला आफीसच्या बाहेरच कुत्र्यासारखे बुटाने मारतो असे म्हणाले. त्यानंतर फिर्यादी न्यायालयाबाहेर आल्यानंतर नरसींग जेठेवाड यांनी फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. त्यावेळी बहिण मध्यस्थी करत असतांना बहिणीस सुध्दा मारहाण केली. दोन्ही आरोपींनी मिळून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यानुसार वजिराबाद पोलीसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3(1) (आर)3(2) (व्ही.ए.) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 68/2024 दाखल केला आहे. हा गुन्हा सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी दाखल केला आहे आणि अनुसूचित जाती जमातीचा कायदा असल्यामुळे तपासासाठी पोलीस उपअधिक्षक शहर यांच्याकडे वर्ग केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *