
नांदेड(प्रतिनिधी)- पोस्ट खात्यात बचत बॅंकेचे सहाय्यक डाकपाल यांनी केलेल्या 77 हजार 228 रुपयांच्या अपहारासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी सहाय्यक डाकपालाला सेवानिवृत्तीनंतर आणि गुन्हा घडल्याच्या 11 वर्षांनी 2 महिने शिक्षा आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या संदर्भाने बुरे काम का बुरा नतिजा अशीच प्रतिक्रिया न्यायालयात ऐकावयाला मिळत होती.
दि.18 जून 2011 रोजी डाकपाल मोहम्मद खदीर मोहम्मद हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बचत बॅंकेचे सहाय्यक डाकपाल प्रभाकर रेशमाजी शिंदे त्यावेळी वय (59) यांनी यांनी डाक विभागाातील पैसे वेगवेळ्या कारणांनी आपल्या मुलाच्या नावाच्या बॅंक खात्यात टाकले. मुळात ते पैसे इतरांचे होते. पण प्रभाकर शिंदे यांनी अशा प्रकारे एकूण 77 हजार 228 रुपयांचा अपहार पोस्ट खात्यात केला. पुढे या संदर्भाची चौकशी झाली आणि नंतर वजिराबाद पोलीस ठाण्याने या प्रकरणी गुन्हा क्रमांक 100/2012 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 409 प्रमाणे दाखल केला. या गुन्ह्यात सेवानिवृत्तीला एक वर्ष शिल्लक असतांना प्रभाकर रेषमाजी शिंदे यांना अटक झाली. या प्रकरणाचा तपास सतिश टाक, सुनिल निकाळजे आणि बी.जी. थोरात अशा तिन पोलीस निरिक्षकांनी करून प्रभाकर रेशमाजी शिंदे विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात हा खटला नियमित फौजदारी खटला क्रमांक 384/2014 प्रमाणे चालला.
तीन पोलीस निरिक्षकांसह एकूण 8 जणांनी या प्रकरणात न्यायालयात आपले जबाब नोंदवले. त्यानंतर प्रभाकर रेषमाजी शिंदे यांनी लेखी स्वरुपात युक्तीवाद सादर करतांना माझ्या नजर चुकीने हा 77 हजार 228 रुपयांचा प्रकार घडला. त्यानंतर मी ते पैसे सुध्दा पोस्ट खात्यात भरले होते. तरी पण डाकपाल मोहम्मद खदीर यांनी माझ्याविरुध्द खोटी फिर्याद दिली.
एकूण उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश किर्ती जैन देसरडा यांनी प्रभाकर रेशमाजी शिंदे यांना दोन महिने शिक्षा, 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.या खटल्या सरकार पक्षाच्यावतीने ऍड. सिमा जोहिरे यांनी काम पाहिले. आरोपी शिंदेच्यावतीने ऍड.बी.एन.शिंदे यांनी काम केले.न्यायालयात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार शेख रब्बानी आणि बालाजी लामतुरे यांनी काम केले.