नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राच्या युवा लेखकांपैकी अंजनेश पन्नालाल शर्मा यांना सन 2022-23 साठी प्रधानमंत्री युवा 2.0 मेंटरशिप योजनेत निवडले गेले आहे. 30 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या 41 नवोदित लेखकांपैकी एक अंजनेश आहेत. नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) च्या वतीने भारतीय ईतिहास, संस्कृती आणि ज्ञान यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध विषयांवर पुस्तके लिहिण्यासाठी अंजनेश शर्मा यांची निवड झाली आहे.
केंद्रीय शिक्षा मंत्रालयाच्यावतीने एनबीटीसोबत सुरू केलेली पीएम युवा मेंटर योजनेचा उद्देश युवकांना आपल्या मातृभाषेमध्ये स्वत:ला व्यक्त करण्याची आणि वैश्वीक स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी हे व्यासपीठ संधी देणार आहे. या निवड केलेल्या लेखकांना पुढील सहा महिन्यापर्यंत 50 हजार रुपये मासिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
अंजनेश पन्नालाल शर्माची निवड इंग्रजीमध्ये लिहिलेली त्यांची पांडूलिपी “डेमोक्रेसी द पाथ वे टु ग्लोबल सिटीजन’ या आधारावर झाली आहे. एनबीटी या नवोदीत लेखकांची पुस्तके इंग्रजीसह अन्य भाषांमध्ये प्रकाशित करणार आहेत. दिल्लीच्या प्रगती मैदानमध्ये विश्र्व पुस्तक मेळाव्यात भाग घेण्यासाठी अंजनेश तेथे गेले असतांना भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यासोबत भेट झाली. अंजनेश शर्माचे त्यांचे कुटूंबिय उमेश परवाल, सुनिल शर्मा, अनिल शर्मा, राघव शर्मा, कमला परवार, मनिषा परवार, निखिलेश शर्मा, सुजाता पिपलवा, रामस्वरुप शर्मा यांच्यासह मुख्य नांदेड खंडेलवाल समाजाने सुध्दा कौतुक केले आहे. अंजनेश शर्मा हे लोकमत समाचारचे पत्रकार पन्नालाल शर्मा यांचे ते सुपूत्र आहेत.
पत्रकार पुत्र अंजनेश यांची पीएम योजनेतील मेंटरशिपसाठी निवड