भाजपने लिंगायत समाजाला न्याय दिला-नागनाथ स्वामी

नांदेड(प्रतिनिधी)-नुकतीच भाजपाने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्या यादीमध्ये लिंगायत समाजाचे नेते तथा बहुजनांचे नेते म्हणून ज्यांची ओळख संपुर्ण नांदेड जिल्ह्याला आहे. असे डॉ.अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी घोषीत केल्याने भाजप पक्षाने लिंगायत समाजांसह बहुजन समाजाला अखेर न्याय दिला. त्यांच्या निवडीने संपुर्ण बहुजन समाज हा आंनदोत्सव साजरा करीत असल्याच्या प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नागनाथ स्वामी वसमतकर यांनी व्यक्त केला. डॉ.अजित गोपछडे हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संंघाशी संलग्नित होते. त्यांनी समाज कार्यांचा वसा हा जोपासलेला आहे. बालवयापासूनच अत्यंत संस्कारीमय जिवन त्यांनी जगले आहे. ते भाजप पक्षाशी गेल्या अनेक दशकापासूनच निष्ठेने काम केले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून व पक्ष संघटन मजबुत करण्यास त्यांनी केलेले योगदान त्यांच्या संपुर्ण कार्याची पावती पाहून पक्षश्रेष्टीने त्यांना राज्यसभेची भाजप पक्षाची उमेदवारी जाहीर केली. खरे तर हा संपुर्ण तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी सु:खद आनंद आहे. त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केल्यानंतर डोळ्याला विश्वासही बसत नव्हता. परंतु अखेर पक्षाने मात्र काम करणाऱ्या व्यक्तींचा उमेदवारी देऊन सन्मान केला आहे. त्यातल्या त्यात लिंगायत समाजाला प्रतिनिधीत्व देऊन भाजप पक्षाने समाजाला न्याय दिल्या असल्याच्या भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पहिल्यांदाचा लिंगायत समाजाचा राज्यसभेवर उमेदवार जातोय ही बाब निश्चितच समाजासाठी भुुषणावह आहे. त्यांच्या निवडीने समाजातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नांदेड जिल्हा हा भाजममय केला आहे. त्यांना देखील पक्षाने राज्यसभेची उमेदवारी देऊन नांदेडमध्ये दोन खासदार दिले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटनमंत्री संजय कौडगे, खा.प्रताप पाटील चिखलीकर, शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, आदी नेत्यांचे लिंगायत समाज हा अभिनंदन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *