नांदेड(प्रतिनिधी)-भोकर विधानसभा मतदार संघाचा आमदारकीचा राजीनामा अशोक चव्हाण यांनी दिलेल्यानंतर ही जागा आता रिक्त झाली आहे. याा जागेवर कोण येणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर अमिता चव्हाण यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता सर्व लोकांच्या इच्छेनुसार उमेदवार देऊ मात्र आम्ही उमेदवार कोणताही लादणार नाही अशी स्पष्ट भुमिका माजी आ.अमित चव्हाण यांनी व्यक्त केली.
संगित शंकर दरबार आणि कुसूम महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आ. तथा शारदा भवन एजुकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेच्यानंतर पत्रकारांनी काही राजकीय घडामोडीवर चर्चा केली असता पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले आहेत तुम्ही कोठे राहणार असा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले की, मी हिंदु संस्कृती सोबत आहे. याचबरोबर भोकर विधानसभेच्याा निवडणुकी विषयी प्रश्न विचारला असता आम्ही कोणताही उमेदवार या भागातील जनतेवर लादणार नाही जनतेचा विचार करून व त्यांच्याशी चर्चा करूनच आगामी भोकर विधानसभेचा उमेदवार जाहीर करू. जर या भागातील जनतेनी श्रीजयाचे नाव सांगितले तर आम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे उमेदवार देऊ मात्र आम्ही जबरदस्तीने कोणताही उमेदवार येथे उभा करणार नाही याचा त्यांनी पुर्नउच्चार केला. याचबरोबर पत्रकारांनी तुम्ही पुन्हा भोकरमधून निवडणुक लढविणार काय असे विचारले असता त्या म्हणाल्या की, मी आता राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. आता येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुनचार करण्यासाठी मी तुम्हची भाभी म्हणून राहणार आहे असे त्यांनी सांगितले.
मतदारांवर आम्ही उमेदवार लादणार नाही-अमिता चव्हाण