नांदेड(प्रतिनिधी)-5 लाख रुपये हैद्राबाद येथील नातलगासाठी देण्यासाठी दिले असतांना ते त्यांच्यापर्यंत पोहचले नाहीत म्हणून एका वाहन चालकाविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे
रामकृष्ण नरहरी शेट्टी श्रीमन नारायण नरहरी शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 फेबु्रवारी रोजी त्यांनी शिवाजी बळीराम वाळके (37) रा.राजेशनगर नांदेड यास 5 लाख रुपये रोख रक्कम दिली. ती रक्कम हैद्राबाद येथील नातेवाईक के.श्रीनिवास यांना द्यायची होती. परंतू पैसे त्यांना दिले नाहीत आणि स्वत:चा मोबाईल बंद केला आणि 5 लाख रुपयांचा अपहार केला आहे.
भाग्यनगर पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 408 नुसार गुन्हा क्रमांक 47/2024 दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार हुंडे हे करणार आहेत.
5 लाख रुपयांचा अपहार