नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीतील वेदांतनगर तरोडा (खु) येथे एक बंद घर फोडून चोरट्यांनी 9 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
संजय गुंडप्पा धाडे यांचे कुटूंबिय 8 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आपले घर बंद करून कुटूंबासह पुणे येथे गेेले होते.11 फेबु्रवारी रोजी दुपारीपर्यंत त्यांचे घर कोणी तरी चोरट्यांनी कडी,कोंडा, कुलूप तोडून घरातील लोखंड पेटीमध्ये ठेवलेले 9 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक सिंगनवाड अधिक तपास करीत आहेत.
वेदांतनगरमध्ये 9 लाख 30 हजारांची चोरी