नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्यावतीने आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हेमंत विस्वा शर्मा हे उद्या 20 फेबु्रवारी रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा मुळ कार्यक्रम निर्मल जिल्ह्यातील भैसा मुधोळ विधानसभा क्षेत्रात जनतेला संबोधीत करणार आहेत.
आपल्या जीवनाची सुरुवात कॉंग्रेस पासून केल्यानंतर 2015 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करुन डॉ.हेमंत विस्वा शर्मा यांनी आसामचे मुख्यमंत्री पद 2021 पासून भुषवित आहेत. उद्या ते नांदेड येथील श्री.गुरु गोविंदसिंघजी विमानतळ येथे दुपारी 12 वाजता पोहचतील. त्यानंतर ते नांदेड-भोकर आणि भैसा या मार्गाने भैसा मुधोळ या तेलंगणातील विधानसभा क्षेत्रात जातील आणि तेथे जनतेला संबोधीत करतील. या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.पदकांती रमादेवी या आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन दुगयाला प्रदीपकुमार हे आहेत. त्यानंतर डॉ.हेमंत बिस्वा शर्मा हे सायंकाळी 4.45 वाजता नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळावर पोहचतील आणि 5 वाजता विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना होतील. याबाबतची माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी महेश वडदकर यांनी जारी केली आहे. हेमंत विस्वा यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान आहे.
आसमचे मुख्यमंत्री उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर