नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रस ही एक विचारधारा आहे. ही विचारधारा घेवून आम्ही समोर जातो. कॉंगे्र्रसला अनेक वेळा अशा अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यामुळे पक्षातून कोणी गेल्यामुळे पक्षाला खिंडार पडत नाही. जुने कार्यकर्ते गेले की, नवीन तयार होत असतात. नेता गेला म्हणजे कार्यकर्ते गेले अस होत नाही. कॉंगे्रस ही सिमेंट कॉंक्रेटसारखी मजबुत पकड असणारा पक्ष आहे असे मत कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले.
प्रदेश कॉंगे्रस कमिटीच्यावतीने जिल्ह्यातील पक्ष गळती थांबविण्यासाठी निरिक्षक पाठविले होते. यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, मराठवाडा प्रभारी अनिल पटेल आणि प्रदेश सचिव मुजाहिद खान हे तीन पक्ष निरिक्षक मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले. त्यांनी जिल्हा कॉंगे्रस कार्यालयात विधानसभा निहाय कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असतांना मोघे म्हणाले की, भाजप हा लोकशाहीला कलंक लावत असल्याची निती अवलंबित आहे. नांदेडमध्ये लोकसभेचा उमेदवार पक्ष श्रेष्ठी ठरवतो. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या विचारधारेपासून नांदेड जिल्ह्यात कॉंगे्रस पक्ष चालत आहे आणि पुढेही चालत राहिल असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, जिल्हा व शहर समन्वयक माजी आ.ईश्र्वरराव भोसीकर, श्रावण रॅपनवाड, माजी जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रविंद्र चव्हाण, सुरेंद्र घोडजकर, माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी जि.प.सदस्य प्रकाश भोसीकर, कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार, डॉ.दिनेश निखाते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या बैठकीला उपस्थितीत होते.
भोकर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
आज पक्ष निरिक्षकांनी विधानसभा निहाय कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. यात सर्वाधिक कार्यकर्त्यांची संख्या भोकर विधानसभा मतदार संघातील होती. या मतदार संघातील तळागळातील कार्यकर्त्यांनी अशोकराव चव्हाण यांनी आम्हाला धोका दिला अशी भावना व्यक्त करीत येणाऱ्या काळात आम्ही कॉंग्रेसच्या सोबत आहोत. लोकसभेसह विधानसभेची जागाा कॉंगे्रसचाच उमेदवार विजयी करणार असा विश्र्वास कार्यकर्त्यांनी पक्षनिरिक्षकांनाा दिला. यामुळे भोकरची संख्या जास्त असल्यामुळे पक्ष निरिक्षकांनीही कॉंगे्रस नांदेड लोकसभा निश्चित जिंकेल असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
कोणाच्या जाण्याने खिंडार पडत नाही-माजी मंत्री मोघे