नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथील गणाचार्य मठ संस्थानचे श्री.ष.ब्र.प्र.108 डॉ.विरुपक्ष शिवाचार्य महाराज यांना गादीवर बसवून 16 वर्ष पुर्ण होत असल्याने त्यांचा 16 वा पट्टाभिषेक सत्कार सोहळा दि.24 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता गणाचार्य मठ मुखेड येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजन समितीने दिली.
श्री.ष.ब्र.प्र.108 डॉ.विरुपक्ष शिवाचार्य महाराज यांचा 16 वा पट्टाभिषेक सोहळा व व्याख्यानमाला आणि गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात व्याख्याते म्हणून ज्येष्ठ साहित्यीक देविदास फुलारी यांच भारतीय संस्कृती व आजचा समाज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राजेश जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच लोकसेवा आयोगामार्फत विविध पदावर विजय संपादन केलेल्याा गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ओमकार एकाळे, कु.मंजुश्री कल्लेवाड, ज्ञानेश्र्वर श्रीरामे, कपिल तमशेट्टे, बालाजी कुलकर्णी आणि संयुक्ता डोईबळे यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली.
डॉ.विरुपक्ष शिवाचार्य यांचा 24 रोजी पट्टाभिषेक सोहळा