नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात आणि शहरात घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या घटना पोलीस दप्तरी नोंद होत असल्याने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेला विशेष पथक स्थापन करून कार्यवाह्या करण्याचे आदेश दिले होते. यात स्थानिक गुन्हा शाखेने 17 घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
यावेळी स्थानिक गुन्हा शाखे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे माहिती देतांना म्हणाले की, नांदेड शहर भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर, आणि नांदेड ग्रामीण या हद्दीतील मोठ्या प्रमाणात घरफोड्या, दुकान, किराणा दुकान, मोबाईल शॉपी, दारु दुकान यासह अन्य ठिकाणी चोऱ्या करून दिसेल ते साहित्य घेवून गेल्याच्या घटना मागिल काही दिवसांपासून गुन्हे दाखल करण्यात आले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेने संजय दत्ता गुंडेवार (33) रा.नंदीग्राम सोसायटी नांदेड आणि व्यंकटेश उत्तमराव तिडके (33) रा.बोंढार या दोन संशयीतांवर लक्ष ठेवून, त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले व त्यांनी आम्ही सदरील गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यानंतर त्यांच्याकडून 10 लाख 29 हजार 201 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत भाग्यनगर, शिवाजीनगर, नांदेड ग्रामीण आणि विमानतळ या पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कार्यकवाही बद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल आहे.
स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;17 घरफोड्या करणाऱ्याा दोघांना अटक