नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने काल दि.21 फेबु्रवारी 2024 रोजी जारी केलेल्या एका आदेशानुसार बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या निरोप समारंभा बाबत असा या आदेशाचा विषय आहे. सध्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या आहेत.
पोलीस महासंचालकांचे आदेश महाराष्ट्रातील सर्वच पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्यासाठी कायमचे लागू असतात. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जारी केलेल्या आदेश क्रमांक 2/2024 मध्ये असे नमुद केले आहे की, विविध दर्जाचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांची बदली होणे, त्यांना एका घटकातून दुसऱ्या घटकात पाठविणे हा त्यांच्या सेवाकाळातील नेहमीचा प्रकार आहे. पण या आदेशात असे लिहिले आहे की, या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार हा गणवेशात असतो. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर रंगीत फेटे बांधले जातात फुलांचा वर्षाव केला जातो, फुलांचा वर्षाव अति प्रमाणात होतो. त्यांना वाहनात बसून संबंधीत पोलीस ठाणे, शाखेचे अधिकारी, अंमलदार हे वाहनास दोरीने ओढत नेतात. असे प्रकार निर्दशनास आले आहेत. तसेच त्यांना शासकीय वाहनात बसून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांसारखा त्यांना निरोप दिला जातो. असे प्रकार पोलीस दलाच्या प्रमाणित कार्यपध्दतीला अनुसरून नाहीत.
अशा प्रकारचा गौरव सोहळ्याचा कार्यक्रम अधिकारी स्वत: किंवा त्यांच्या हस्तकांमार्फत प्रसिध्दी मिळविण्यासाठी करतात. स्वत: किंवा त्यांचे हस्तक या कार्यक्रमाचे सोशल मिडीयाच्या माध्यमाने प्रसारण करतात. त्यामुळे प्रसिध्द होण्याऐवजी जनतेच्या मनात चेष्ठेचा विषय बनतो. स्थानिक नागरीक हे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केलेल्या चांगल्या कामांचा, त्यांचा कर्तृत्वांचा नेहमी सन्मान करतात. न की अशा दिखाव्यांसाठी.
या आदेशाद्वारे सर्व पोलीस घटकप्रमुखांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे, विविध शाखामध्ये बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या बदलीचा निरोप समारंभ आयोजित करतांना वरील सर्व प्रकार होणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक असून तशी सुचना त्यांचे अधिनिस्त सर्व पोलीस ठाणे आणि शाखा प्रभारी, सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांना सक्त सुचनाा देणे आवश्यक आहे.
पोलीस महासंचालकांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष झाले तर, पालन करण्यात कसूरी केली तर संबंधीत व्यक्तीविरुध्द कडक कार्यवाही करण्याची जबाबदारी सर्व घटक प्रमुख आणि त्यांचे परिवेक्षीय अधिकारी यांची असते. तसेच अशा प्रकारची कोणतीही बाब पोलीस मुख्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शनास जर आली तर त्या बाबत घटक प्रमुख यांना जबाबदार ठरविले जाणार आहे.
पोलीस महासंचालक साहेब आपण दिलेल्या आदेशाचे पालन होणे ही बाब पोलीस दलात क्रमप्राप्त आहे. कारण आजच नव्हे तर हजारो वर्षापासून पोलीस दलाबद्दल तोंड दाबून बुक्यांचा मार ही म्हण रुजलेलीच आहे. साहेब काही लोकांनी असा प्रकार केला असेल पण काही लोक नक्कीच या सन्मानाचे भागिदार होणे नागरीकांना आनंद देणारे असते. आम्ही एका गुजरातच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचा उल्लेख करू इच्छीतो त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जिल्ह्याची हद्द संपेपर्यंत त्यांचा जो सन्मान झाला तो त्यांच्या कर्तृत्वाचाच होता. आता या घटनेला कोणी तरी चित्रीकरण केले हेही सत्य आहे. पण त्यांचा झालेला सन्मान नक्कीच खोटारडा नाही, बनावट नाही, त्यांच्या हस्तकांनी केला नाही हे त्या व्हिडीओमध्ये सुध्दा दिसते. चुकीच्या पोलीसांवर कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्रांच्या नागरीकांकडे पोलीस महासंचालक साहेब यांच्या शिवाय दुसरा व्यक्ती उपलब्ध नाही. पण आपण सुध्दा एवढ्या मोठ्या पदावर बसला आहात. आपणही सहाय्यक पोलीस अधिक्षक या पदापासूनच पोलीस महासंचालक पदापर्यंत पोहचला आहात. तेंव्हा काही आमचे शब्द पटतात तर बघा नाही तर राहिल…