शिवसेना ग्रंथालय सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी बी.जी.देशमुख यांची निवड; आमच्या कामामुळे शिवसेनेचे 3 लाख मतदान वाढणार-देशमुख

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील डी.जी.देशमुख यांच्या प्रयत्नांनी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बी.जी.देशमुख यांच्या ग्रंथालय सेलला आता शिवसेना ग्रंथालय असे नाव बदलून त्यांना महाराष्ट्राचे अध्यक्ष केले आहे. शिवसेना ग्रंथालय सेलमुळे भविष्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला 3 लाखांचे मतदान आम्ही राज्यात वाढवून देणार आहोत असे प्रतिपादन बी.जी.देशमुख यांनी केले.

आपल्या विद्यार्थी दशेपासूनच ग्रंथालय ही चळवळ चालवतांना बी.जी.देशमुख यांनी आपल्या मित्रांकडून घेतलेल्या आर्थिक मदतीवर सुरू केली होती. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी ग्रंथालय सुरू केल.त्यातून त्यांनी राज्यात 6 हजार ग्रंथालय सुरू केले आणि ग्रंथालय चांगल्या स्थितीत चालत होते. कोणी तरी यामध्ये मिठाचा खडा टाकला आणि यामध्ये अ,ब,क,ड या ग्रंथालय दर्जातील काही तरी त्रुटी धरुन या ग्रंथालय सेलमध्ये घोळ आहे असे दाखवले. ग्रंथालय सेल हा विभाग अगोदर 122 कोटीचा होता. पुढे तो 157 कोटीचा झाला आणि आज हा विभाग 210 कोटीचा झाला आहे. ग्रंथालयातील दर्जाप्रमाणे ड-100 पुस्तके, क-1000 पुस्तके, ब-5000 पुस्तके, ब-1-7000 पुस्तके आणि अ-10000 पुस्तके असे विभागीकरण आहे.

आपल्या चळवळीत मिठाचा खडा पडल्यानंतर बरीच वर्ष गप्प राहिले. परंतू एखादी चळवळ सुरू केल्यानंतर ती चळवळ चालूच राहिली पाहिजे म्हणून आपल्या पध्दतीने हळुहळु या चळवळीला आकार देत बी.जी.देशमुख यांनी 12700 ग्रंथालय राज्यात तयार केली आहेत. त्यातील नांदेड जिल्ह्यात 700 ग्रंथालय आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर एक निवेदन दिले. त्यानंतर आम्ही कधीच आमच्या निवेदनाची त्यांना स्मृती करून दिली नाही ,पुन्हा भटलो नाहीत. तरी आमच्या ग्रंथालय निधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. 56 वर्षाच्या लढ्यानंतर 500 रुपयांचे अनुदान आता 30 हजार रुपये झाले आहे. आमच्या ग्रंथपालाला 1750 रुपये आम्ही वेतन देतो. ही दुरावस्था असल्याचे सांगितले.

माझ्या नवीन कामात खा.गजानन किर्तीकर, आ.बालाजी शिंदे, राजेश क्षीरसागर, डी.के.पवार, अशोक जाधव, सिताराम गव्हाणे, बाळासाहेब जाधव, माधव कदम यांनी माझ्यासोबत भरपूर मेहनत घेतली. आपल्याला शिवसेना ग्रंथालय सेल अध्यक्षपदावर निवड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बी.जी.देशमुख यांनी आश्वासन दिले आहे की, मी येत्या विधानसभा निवडणुकी अगोदर 60 हजार खेड्यांमध्ये ग्रंथालय सेल पोहचविणार आहे. त्यांच्या गुणाकाराप्रमाणे माझ्या कामामुळे शिवसेनेला राज्यात 3 लाख मतदान वाढवून मिळणार आहे.

या प्रसंगी सर्व पत्रकारांचा बी.जी.देशमुख यांनी सन्मान केला. काही पत्रकारांनी त्यांची शिवसेना ग्रंथालय सेल महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांचाही सत्कार केला. या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे नेते उदय पाटील शिंदे, तुलजेश यादव, विक्रम पाटील बामणीकर, बाली नागलेवार यांची उपस्थिती होती. शिवसेना ग्रंथालय सेलचे कार्यकर्ते सरकटे, माधव कदम, दिनेश लक्षटवार, राजेश मोरे, शाम पाटील यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *