नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी पाच युवकांना पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, तीन काडतूस आणि चार लोखंडी खंजीर जप्त केले आहेत.
नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास केसरबाई प्रदीप सरपे यांच्या घरासमोर त्यांनी काही युवक उभे असलेले पाहिले. त्यांनी त्यांना विचारणा केली तेव्हा ते कोणाच्या तरी खून करण्याच्या उद्देशाने तेथे थांबले होते, अशी माहिती समोर आली. त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, तीन काडतूसे आणि चार लोखंडी खंजीर सापडले आहेत. त्यातील एक युवक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. इतर पकडलेल्या व्यक्तींच्या नावे माधव रामदास गायकवाड (32) रा. भीक्षानगर, बळीरामपूर नांदेड, अजय उर्फ लड्या भगवान जोगदंड (22) रा. राहुलनगर सिडको, विशाल रमेश शितळे (23) रा. विजयनगर, सिडको, आकाश रमेश शितळे (20) रा. विजयनगर सिडको अशी आहेत. या सर्वांनी जिवे मारण्याचा उद्देश ठेऊन केलेल्या या तयारीसाठी त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 306, 353, 143, 147, 148, 149 तसेच 3/25 आणि 4/25 भारतीय शस्त्र कायद्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 150/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन गडवे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीणचे पेालीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, विक्रम वाकडे, शेख सत्तार, अर्जुन मुंडे, संतोष बेल्लूरोड, माधव माने, श्रीराम दासरे, ज्ञानेश्वर कलंदर, शिवानंद तेजबंद यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, इतवारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांचे या कारवाईसाठी कौतुक केले आहे.