नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभुमीवर सर्वच विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आणि त्यांची मार्गदर्शकतत्वे निवडणुक आयोगाने जारी केली होती. त्यानुसार नांदेड पोलीस परिक्षेत्रातील बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. परंतू पुन्हा त्यात निवडणुक आयोगाने 22 फेबु्रवारी रोजी काढलेल्या त्रुटीप्रमाणे पुन्हा एकदा नवीन बदल्या करण्यात आल्या आहेत. नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 8 पोलीस निरिक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 38 पोलीस उपनिरिक्षकांना पुन्हा एकदा नवीन नियुक्त्या दिल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र डॉ.शशिकांत महावरकर यांनी जारी केले आहेत. पण या बदल्यांमध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवेची फक्त 3 वर्ष शिल्लक राहिली आहेत अशांना सुध्दा बदली देण्यात आली होती. परंतू काल नांदेड पोलीस परिक्षेत्रात झालेल्या बदल्यांमध्ये त्या बदल्या जशा झाल्या तशाच आहेत. त्यांना काही एक दिलासा मिळाला नाही.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी आठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत ज्यामध्ये मोहन बाळासाहेब भोसले, संतोष बापूराव तांबे, नितीन भास्करराव काशीकर, जयप्रकाश काशीनाथ गुट्टे यांना नांदेड जिल्ह्यात अ कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात आली होती. परंतू काल झालेल्या बदल्यांमध्ये या चौघांनी नांदेड जिल्ह्यात 4 वर्ष 3 महिने सेवापुर्ण केल्यामुळे त्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यामध्ये भोसले, तांबे आणि काशीकर यांना हिंगोली आणि जयप्रकाश गुट्टे यांना परभणी जिल्ह्यात पाठविले आहे. वाहतुक शाखेतील सुर्यमोहन नारायण बोलमवाड यांना त्यांचा मुळ जिल्हा नांदेड असल्यामुळे त्यांना परभणीत पाठविले आहे.हिंगोली मुळ जिल्हा असलेले सोनाजी सुर्यभान अंमले आणि चंद्रशेखर आनंदराव कदम यांना नांदेड जिल्ह्यात बोलवले आहे.सध्या मागील बदल्यांमध्ये हिंगोली येथे नियुक्ती मिळालेले दिपक अंबादास बोरसे यांनी मागील लोकसभा निवडणुकीच्या मतदार संघात असल्यामुळे त्यांना परभणी येथे पाठविले आहे.
10 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना अशाच प्रकारे बदल्या दिल्या आहेत. ज्यामध्ये नांदेड हा मुळ जिल्हा असणारे 7 सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. यांना नांदेड जिल्ह्यातच अ कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात आली होती. आता त्यांना नवीन जिल्ह्यात नियुक्ती दिली आहे. त्यांची नावे राजू सायन्ना मुत्तेपोड, शिवराज गंगाराम जमदडे, शिवसांब ईश्र्वर स्वामी, साईप्रसाद नरसींगराव चन्ना, शिवाजी गंगाधर सिंगनवाड (परभणी), किशोर बाबुराव बोधगिरे, नंदलाल भुरालाल चौधरी (हिंगोली), हिंगोली जिल्ह्यात 4 वर्षात 3 वर्ष सेवा पुर्ण करणारे सुनिल महादेव गिरी यांना नांदेडला पाठविले आहे. मुळ लोकसभा मतदार संघ असलेल्या हिंगोली येथील रेखा शामराव शाहारे यांना परभणी जिल्ह्यात पाठविले आहे.परभणी मुळ लोकसभा मतदार संघ असणाऱ्या दिनेश जगदीश मुळे यांना नांदेडमध्ये पाठविले आहे.
नांदेड हा मुळ जिल्हा असलेले 26 पोलीस उपनिरिक्षक दुसरीकडे पाठविले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. विजय लिंगुराम पंतोजी, प्रशांत नागोराव जाधव, बळीराम व्यंकटराव राठोड, घनशाम परशुराम वडजे, जुम्मा खान अंबीय्या खान पठाण, सुरजितसिंघ किशनसिंघ माळी, व्यंकट तुकाराम गंगलवाड, दिगंबर पांडूरंग पाटील, जयश्री विठ्ठल गिरे, कपिल शंकर बुध्देवार, ज्योती रामराव बळेगावे, (परभणी), विनायक नागोराव केंद्रे, नागोराव वसंतराव जाधव, गोविंद बालाजीराव जाधव, देवानंद शंकर फडेवाड, (हिंगोली), रवि यादवराव बुरकुले, जळबाजी एकनाथ गायकवाड, प्रदीप भानुदास गौड, गजानन विजय अन्सापुरे, सुनिल अशोक भिसे, संजय तुकाराम गायकवाड, सुनिल जयराम पल्लेवाड, भारत रमेश जाधव, व्यंकट रामचंद्र कुसमे, बाबू विश्र्वनाथ गिते, नागनाथ हनुमंत गौडा तुकडे(लातूर). लातूर हा मुळ जिल्हा असलेले चार पोलीस उपनिरिक्षक नांदेडला पाठविले आले आहेत. त्यांची नावे कविता प्रभाकर जाधव, व्यंकट बाबुराव कव्हाळे, बस्वराज माणिक तपसाळे, सुचिता माधवराव शिंगाडे, अमर सुरेश केंद्रे. परभणीमध्ये गुन्हा दाखल असलेले पोलीस उपनिरिक्षक विनोद नागनाथ साने यांना नांदेड येथे पाठविले आहे. परभणी हा मुळ जिल्हा असलेले अशोक बाबराव कदम यांनाही नांदेडला पाठविले आहे. हिंगोली हा मुळ लोकसभा मतदार संघ असलेले चार पोलीस उपनिरिक्षक बदलण्यात आले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. होनाजी संगनाजी चिरमाडे, टोपाजी एकनाथराव कोरके(लातूर), चितरंजन ज्ञानोबा ढेमकेवाड (परभणी).लातूर या लोकसभा मतदार संघात मागे कार्यरत असलेले चंदनसिंह रामसिंह परीहार यांना परभणी येथे पाठविले आहे.
निवडणुक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस सेवेची 3 किंवा त्या पेक्षा कमी वर्षे शिल्लक आहेत. त्यांच्याही बदल्या झालेल्या आहेत. त्यांना पुन्हा पाठविण्याचे सुध्दा सांगण्यात आले होते. मात्र त्यावर काही एक कार्यवाही काल तरी नांदेड पोलीस परिक्षेत्रात झालेली नाही. नांदेड येथील उत्तम बुक्तरे या पोलीस उपनिरिक्षकांची बदली लातूर येथे करण्यात आलेली आहे. त्यांच्या सेवेचे दोन वर्ष आणि काही महिने शिल्लक आहेत. त्यांनी सुध्दा निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार माझी बदली परत नांदेड जिल्ह्यात करावी असा अर्ज दिला आहे. परंतू त्या संदर्भाची कार्यवाही मात्र काल तरी नांदेड पोलीस परिक्षेत्रात झालेली नाही. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी होणे शिल्लक आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभुमीवर पुन्हा एकदा नांदेड पोलीस परिक्षेत्रात 8 पोलीस निरिक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 38 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या