नांदेड(प्रतिनिधी)-कलामंदिरजवळच्या उड्डाण पुलाजवळ 19 मे च्या पहाटे एक जबरी चोरी घडली. त्यात 8 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरीला गेला. मौजे मरतोळी ता.देगलूर गावात 38 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार घडला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी व मोबाईल आणि रोख असा 69 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
प्रविण किशन पावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 मेच्या पहाटे 4.30 वाजता ते आणि त्यांचे सहकारी मित्र बैंगलुरूला जाण्यासाठी रात्रभर मुक्कामी थांबले. त्यावेळी उड्डाणपुलाच्या खाली चार जणांनी त्यांना अडवून मारहाण करून, फायटर आणि दगडांचा वापर करून त्यांच्यावर दहशत निर्माण केली आणि त्यांच्याकडील दोन मोबाईल आणि 8 हजार 380 रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 168/2022 प्रमाणे नोंदवला असून त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 395, 506, 34 जोडण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे हे करीत आहेत.
मरतोळी ता.देगलूर येथील सन्मुख ज्ञानदेव सुखनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता काही जणांनी त्यांना रस्त्यात अडवून तु केलेली फौजदारी केस मागे घे म्हणून कत्तीने मारहाण केली, त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा 38 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. मारहाण करणारे चार जण होते. त्यांची नावे माधव दिगंबर सुकनाळे, गंगाधर केरबा सुकनाळे, तुकाराम गंगाधर सुकनाळे, दिगंबर केरबा सुकनाळे अशी आहेत. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 89/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 392 आणि 34 नुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे हे तपास करीत आहेत.
शेख अमदज शेख निजाम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 मे च्या मध्यरात्री मातोश्री मंगल कार्यालय व माहेश्र्वरी भवन मंगल कार्यालयाच्या मध्यभागी असलेल्या रस्त्यावर त्यांची दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.के.2580, 30 हजार रुपये किंमतीची आणि एक मोबाईल 29 हजार रुपयांचा आणि 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 69 हजार रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 297/2022 चोरीच्या सदरात दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते अधिक तपास करीत आहेत.