नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी 53 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरफोडून चोरट्यांनी 70 हजार रुपये रोख चोरले आहेत. किनवटत शहरात एक 10 हजारांचा मोबाईल चोरीला गेला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
मोहम्मद तफजुल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिमायतनगर शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावर त्यांचे जनता मेडिकल आहे. दि.20 मेच्या रात्री 12.30 ते 1 वाजेदरम्यान हे दुकान चोरट्यांनी फोडले आणि त्यातून मॉनिटर , कनेक्टर, डोंगल, सीसीटीव्ही कॅमेरे आणि रोख रक्कम असा 53 हजारांचा ऐवज चोरला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सींगनवाड अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना कोठा येथे राहणारे राजेंद्र गणपत पवार हे 19 मे च्या रात्री तिरुपती दर्शनाला निघाले. 20 मे च्या रात्री 2 वाजेच्यासुमारास त्यांचे घर फोडलेले होते. घरातून चोरट्यांनी 70 हजार रुपये रोख रक्कम चोरली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार सुर्यवंशी हे करीत आहेत.
बालाजी रामकिशन मुरकुते यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल 19 मे रोजी ते आपला 45 वा वाढदिवस साजरा करतांनाच्या गर्दीतून चोरीला गेला आहे. किनवटपोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मामीडवार अधिक तपास करीत आहेत.
अनिल संभाजी नरवाडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एफ.2229 ही 17 मेच्या 12 वाजल्यापासून ते 18 मे रात्री 9 वाजेदरम्यान छत्रपती चौकातील महानंदा किराणा प्रोव्हीजन समोरून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 30 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मंगनाळे अधिक तपास करीत आहेत.
दुकान फोडले, घरफोडले, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी